शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मोदींमुळे विकासप्रश्न मार्गी लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 00:17 IST

विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोदी हे निधी कमी पडू देणार नाहीत, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे : दुष्काळी बीड जिल्ह्यातील विकासाच्या स्वप्नांना मिळाली ताकद; योजनांना निधी कमी पडू देणार नाही

परळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येण्याने आम्हाला खूप आनंद झाला, आमच्या विकासाच्या स्वप्नांना ताकद मिळाली. दुष्काळी जिल्ह्याच्या विकासाची तहान आपल्या आगमनामुळे भागणार आहे. विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोदी हे निधी कमी पडू देणार नाहीत, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.बीड जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदानावर मोदी यांची जाहीर सभा झाली. नरेंद्र मोदी आले की विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देतात हा आपला अनुभव आहे. जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. २०१४ मध्ये रेल्वेसाठी २८०० कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. गोरगरीबांच्या कल्याणासाठी त्यांनी लाखो कोटी रुपयांचा निधी दिला. महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचे सरकार येणार आहे. आपण महायुतीचे सर्व उमेदवार विजयी करून सत्तेतील टक्का वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह आ. सुरेश धस, आष्टीचे उमेदवार आ. भीमराव धोंडे, बीडचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर, गेवराईचे लक्ष्मण पवार, माजलगावचे उमेदवार रमेश आडसकर, केजच्या उमेदवार नमिता मुंदडा आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, ज्येष्ठ नेते प्रा. टी.पी. मुंडे, तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, नेताजी देशमुख यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.क्षणचित्रेनरेंद्र मोदी यांची सभा वैद्यनाथ महाविद्यालया समोरील मैदानावर आयोजित करण्यात आली होती, सकाळी ११.३३ वा. हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने त्यांचे आगमन झाले.नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरूवात मराठीतून केली. वैद्यनाथाच्या पावनभूमीत व माझे मित्र गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कर्मभूमीत मी आलो आहे, संताच्या या भूमीत माझा सर्वाना नमस्कार असे म्हणताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. मोदींनी ३५ मिनिटे भाषण केले.पंकजा मुंडे यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, पती डॉ. अमित पालवे, अ‍ॅड. यश:श्री मुंडे यांनी लोकांमध्ये बसून भाषण ऐकले. सूत्रसंचालन खा. प्रीतम मुंडे यांनी केले.पंकजा मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाची चांदीची पिंड, प्रतिकात्मक रेल्वे देऊन मोदींचा सत्कार केला.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळीNarendra Modiनरेंद्र मोदीPankaja Mundeपंकजा मुंडे