शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कपिलधार येथून मोबाइल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:40 IST

राक्षसभुवन येथे तीन लाखांचा वाळूसाठा पकडला गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्रात अवैध उपसा करून साठा केलेल्या वाळूवर ...

राक्षसभुवन येथे तीन लाखांचा वाळूसाठा पकडला

गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्रात अवैध उपसा करून साठा केलेल्या वाळूवर छापा टाकला. तीन लाख रुपयांचा १०० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई १६ ऑगस्ट रोजी करण्यात आली. राक्षसभुवनचे तलाठी गोविंद ढाकणे यांनी ही कारवाई केली. ढाकणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रॅक्टरचालक व केनीचालक यांच्यावर चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

....

डोळ्यात चटणी टाकून पतीस मारहाण

माजलगाव: पतीला माहेरी बोलावून घेत डोळ्यात चटणी टाकून काठीने मारहाण केल्याची घटना शहरातील एकनाथनगरात १५ ऑगस्ट रोजी घडली. दत्ता लहूराव वाघमारे (३०, रा.मंजरथ ता.माजलगाव) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या तक्रारीवरुन प्रियंका दत्ता वाघमारे, द्रौपदा शिवाजी धारक, वसंत शिवाजी धारक यांच्यावर शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

....

मारहाण करुन १५ हजार हिसकावले

परळी: ऊसतोडीच्या पैशाच्या व्यवहारातून एका वृध्दास घरात घुसून मारहाण करुन १५ हजार रुपये हिसकावून नेले. ही घटना ९ ऑगस्ट रोजी रेवली येथे घडली. प्रभू विठोबा मुंडे (७०) असे जखमीचे नाव आहे. पैसे परत द्या असे म्हणत प्रभू यांना मारहाण करण्यात आली. खिशातूून बळजबरीने १५ हजार रुपये काढून घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. प्रभू मुंडे यांच्या तक्रारीवरुन सतीश बाबासाहेब मैंद

(रा.मैंदवाडी ता.धारुर) याच्यावर सिरसाळा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

....

केजमध्ये चोरट्यांनी मेडिकल फोडले

केज: शहरातील रोजामोहल्ला परिसरात ऐतेशाम मुस्ताक खतीब यांचे मेडिकल दुकान फोडून चोरट्यांनी हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांनी बंद मेडिकलच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. १५ हजार रुपयांचा मोबाइल व २७ हजार ८७० रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी केज ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

....

बर्दापूर येथून रोकड, टीव्ही लंपास

अंबाजोगाई: तालुक्यातील बर्दापूर येथे शांताबाई बालाजी चव्हाण यांच्या घरात शिरुन चोरट्यांनी १३ ते १६ ऑगस्ट दरम्यान रोख ७ हजार रुपये व ७ हजार किमतीचा टीव्हा असा एकूण १४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शांताबाई या बाहेरगावी होत्या. ही संधी साधत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. याप्रकरणी बर्दापूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

.....

बाहेगव्हाण येथून विद्युतपंप लंपास

वडवणी: तालुक्यातील बाहेगव्हाण येथून चोरट्यांनी एका शेतकऱ्याच्या शेतातील १५ हजार किमतीचा विद्युतपंप लंपास केला. ही घटना १४ ऑगस्ट रोजी घडली.तुळशीराम बळीराम मस्के यांना मुख्यमंत्री सोलार किसान योजनेतून विद्युतपंप मिळाला होता. तो त्यांनी विहिरीवर बसविला होता. चोरट्यांनी तो पळवला. तुळशीराम मस्के यांच्या तक्रारीवरुन वडवणी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

...

.