शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लघुशंकेला थांबले अन् १० लाखांचा गुटखा गमावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:36 IST

लघुशंका करण्यासाठी गुटख्याने भरलेला टेम्पो रस्त्याच्याकडेला उभा केला. एवढ्यात पिंपळनेर पोलीस आले आणि झडती घेतली. यामध्ये तब्बल १० लाख रूपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी टेम्पोसह चालक, क्लिनरला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बीड तालुक्यातील भाटसांगवी परिसरात केली.

ठळक मुद्देपिंपळनेर पोलिसांची कारवाई : टेम्पोसह चालक, क्लिनर घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लघुशंका करण्यासाठी गुटख्याने भरलेला टेम्पो रस्त्याच्याकडेला उभा केला. एवढ्यात पिंपळनेर पोलीस आले आणि झडती घेतली. यामध्ये तब्बल १० लाख रूपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी टेम्पोसह चालक, क्लिनरला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बीड तालुक्यातील भाटसांगवी परिसरात केली.पिंपळनेर पोलीस ठाण्याकडून रात्र गस्त सुरू होती. याचवेळी त्यांना भाटसांगवी जवळ एक टेम्पो (एम.एच. ४६ ए.आर. २९२६) संशयास्पदरित्या उभा दिसला. त्यांनी विचारपूस केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासणी केली असता टेम्पोत गुटखा असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ संतोष गणपती रेड्डी (३० बडी भोंडगाव ता.निलंगा), शेषराजू कुट्टेगवडा (२७ रा.बेंगलोर) यांना ताब्यात घेतले. टेम्पो पोलीस ठाण्यात आणण्यात आला. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून पुढील कारवाई केली जात असल्याचे सपोनी उबाळे यांनी सांगितले.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि बी.डी.झिंजुर्डे, गायकवाड, येवले यांनी केली. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.उमरग्यातून चालक बदललागुटखा माफियांची साखळी आहे. बेंगलोरहून गुटखा आल्याचे सांगण्यात आले. उमरगा येथून टेम्पो चालक बदलण्यात आले होते. यानंतर जालना येथे चालक बदलला जाणार होता. केवळ मोबाईलवरून हा सर्व प्रकार चालत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या साखळीचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीस