शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
4
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
5
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
6
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
7
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
8
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
9
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
10
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
11
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
12
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
13
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
14
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
15
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
16
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
17
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
18
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
19
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
20
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

बीडमध्ये कोट्यवधींचा निधी ‘चिखलात’; रिमझिम पावसाने मैदान खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:36 IST

क्रीडांगण विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. परंतु जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे मैदानाची बकाल अवस्था झाली. एवढेच नव्हे तर रिमझिम पावसानेच मैदानात सर्वत्र चिखल झाल्याचे बुधवारी दिसले.

ठळक मुद्देगलथानपणामुळे बीपीएलचे उद्घाटन रद्द करण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : क्रीडांगण विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. परंतु जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे मैदानाची बकाल अवस्था झाली. एवढेच नव्हे तर रिमझिम पावसानेच मैदानात सर्वत्र चिखल झाल्याचे बुधवारी दिसले.

त्यामुळे क्रीडांगण विकासासाठी खर्च केलेला कोट्यवधींचा निधी ‘चिखलात’ गेल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने क्रीडा कार्यालयाचा गलथान ‘खेळ’ चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, या चिखलामुळेच प्रतिष्ठेच्या मानली जाणा-या ‘बीपीएल’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटनही रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली.

मागील काही महिन्यांपासून जिल्हा क्रीडा कार्यालयातील कार्यालयीन कामकाज ढेपाळण्याबरोबरच मैदानाचीही पूर्णत: वाट लागली आहे. क्रीडांगण विकास करण्यासाठी जिल्हा प्रशासन व वेगवेगळ्या योजना, संकुल समितीतून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. परंतु येथील जिल्हा क्रीडा अधिकारी व इतर संबंधित अधिकाºयांनी गुत्तेदारांशी संगनमत करुन कामे निकृष्ट केली. याचा परिणाम अवघ्या काही महिन्यांतच दिसून आला.

ज्या कामांसाठी कोट्यवधी खर्च केले ते अवघ्या दोन ते तीन महिन्यांतच खराब झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर या संबंधित गुत्तेदारांवर कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाºयांनाच गुत्तेदारांनी खडसावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आम्ही तुमचे काम ‘उत्कृष्ट’ केले, असे सांगून अधिकाºयांनाच ‘चालते व्हा’ असे बोल सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे कार्यालयातील कामे करण्यासाठी येथील अधिकारी हे ‘टक्केवारी’ने पैसे वसूल करीत असल्याचेही नानकसिंग बस्सी यांच्यावरील कारवाईवरुन स्पष्ट झाले होते. बस्सी सारख्या अधिका-यांची पाठराखणही जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी केली होती. त्यामुळे या ‘टक्केवारी’त त्यांचाही ‘वाटा’ असल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केला आहे.खुरपुडेंकडून दिशाभूलक्रीडा संकुल दर्जेदार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे या जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना प्रत्येक बैठकीत सांगतात. कागदोपत्री कामकाज दाखवून जिल्हाधिकाºयांची दिशाभूल खुरपुडे करीत आहेत. महसूल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने खुद्द जिल्हाधिकाºयांनीच संकुलाची बकाल अवस्था काही दिवसांपूर्वीच पाहिली आहे.या कार्यक्रमासाठी मैदान समितीत असतानाही नंदा खुरपुडेंनी कारण सांगून दांडी मारली. आपला गलथान कारभार चव्हाट्यावर येईल, या भीतीनेच त्यांनी असे कृत्य केल्याची चर्चा होती.खुरपुडे या वारंवार या ना त्या कारणावरून जिल्हाधिकाºयांची दिशाभूल करीत असल्याचे आरोप क्रीडाप्रेमींमधून होत आहेत.क्रीडा कार्यालयात अंतर्गत राजकारण; डीएसओंची मनमानीक्रीडा कार्यालयात अंतर्गत राजकारणही जोरात सुरू आहे. क्रीडा अधिकारी व इतर कर्मचारी, मार्गदर्शकांना खुरपुडेंकडून उद्धट वागणूक दिली जात आहे. तसेच कारवाइची धमकी देऊन दबाव आणला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी खुरपुडे यांची व कार्यालयातीलच एका अधिकाºयासोबत ‘तूतू-मैंमै’ झाली होती. हा वाद उपसंचालकांपर्यंत गेल्याचेही सूत्रांनी सांगितले. दिवसेंदिवस खुरपुडे यांची मनमानी वाढत असून त्यांची कारकीर्दही वादग्रस्त असल्याचे समोर येत आहे.

लाखांचे भाडे हजारांवरस्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मैदानाचे भाडे व इतर प्रोसेस पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु या स्पर्धा व्यावसायिक असल्याचे कारण पुढे करून नंदा खुरपुडे यांनी यासाठी लाख रूपयांचे भाडे आकारले. त्यानंतर असोसिएशनने आवाज उठविला. आपली तक्रार वरिष्ठांकडे होईल, या भीतीने त्यांनी स्पर्धेच्या उद्घाटनाच्यादिवशी जिल्हाधिकारी यांना टिप्पणी टाकून हजार रूपये भाडे आकारण्याचे सुचविले. रात्री उशिरापर्यंत त्याला मंजुरी मिळाली की नाही, याचीही कल्पना त्यांना नव्हती. यावरून त्यांचा कारभार कशाप्रकारे चालतो, हे स्पष्ट होते. लाख रूपयांचे भाडे आकारून नेमके काय करायचे होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Beedबीडpwdसार्वजनिक बांधकाम विभाग