शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभराच्या खंडानंतर बीड जिल्ह्यात सौम्य पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST

बीड : महिनाभर खंड दिल्यानंतर १६ ऑगस्ट रोजी रात्री जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांना दिलासा ...

बीड : महिनाभर खंड दिल्यानंतर १६ ऑगस्ट रोजी रात्री जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील २४ तासात गेवराई, बीड, पाटोदा व शिरूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. इतरत्र मात्र अल्प पावसाची नोंद आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या. जून व जुलैमध्ये जिल्ह्यात ३९१.९ मिमी. पाऊस झाला. मात्र, जुलैच्या काही दिवसच पाऊस झाला होता. तब्बल एक महिना पावसाने दडी मारल्याने प्रामुख्याने सोयाबीनसह अन्य पिके जळण्याच्या मार्गावर होती. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून होता. १७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ २९.२ मिमी. पाऊस नोंदला आहे. १६ ऑगस्ट रोजी रात्री बीड, गेवराई, पाटोदा व शिरूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना बुस्टर डोस मिळाला असला तरी इतर तालुक्यांमध्ये परिस्थिती अद्याप चिंताजनक आहे.

------

१७ मे रोजी नोंदलेला पाऊस

बीड २०.५ मिमी., पाटोदा १९.४, आष्टी ३.७, गेवराई ५५.४, माजलगाव ३.५, अंबाजोगाई २.५, केज १.६, परळी २.२, धारूर १.०, वडवणी २.५ आणि शिरूर कासार तालुक्यात १६ मिमी.

-----------

जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ५६६.१ मिमी इतके आहे. आतापर्यंत ४२१ मिमी. पाऊस नोंदला असला तरी खंड पडल्याने उडीद, मूग, सोयाबीन, कापूस आदी पिकांना फटका बसला आहे.

-----

जिल्ह्यात आतापर्यंत झालेला एकूण पाऊस

बीड ३११ मिमी., पाटोदा ३३२, आष्टी २८५, गेवराई ४३१, माजलगाव ५०६, अंबाजोगाई ६०७, केज ४२५.४, परळी ५६८.४, धारूर ५५७.५, वडवणी ४८२.९ आणि शिरूर कासार तालुक्यात ३१९ मिमी.

-----------