शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

मेहकरी धरणात वाढीव ७.३० दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:28 IST

सीना धरणातून मेहेकरी धरणात ७.३० दलघमी वाढीव पाणी सोडण्यास मंजुरी दिली असल्याचे आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. साहेबराव दरेकर यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : तालुक्यात या वर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यासाठी जलसंपदा विभाग व अजित पवार यांच्याकडे कुकडीचे पाणी सीना धरणात व तिथून मेहकरी धरणात सोडण्यासाठी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार १३ नोव्हेंबर रोजीच्या पत्रानुसार सीना धरणातून मेहेकरी धरणात ७.३० दलघमी वाढीव पाणी सोडण्यास मंजुरी दिली असल्याचे आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. साहेबराव दरेकर यांनी सांगितले.आ. आजबे बोलताना म्हणाले, २८ आॅक्टोबर रोजी आष्टी तालुक्यातील मेहकरी धरणात सीना धरणातून ०.५ टी.एम.सी पाणी सोडविण्यात यावे असे निवेदन मुख्य अभियंता (वि.प्र) जलसंपदा विभाग पुणे यांना दिल्याने ह्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. सीना मध्यम प्रकल्पातुन मेहकरी धरणात पिण्यासाठी अनुज्ञेय २५८.०४ एमसीएफटी म्हणजेच ७.३० दशलक्ष घनमीटर पाणी वाढीव मिळाले आहे. सीना - मेहकरी उपसा सिंचन योजनेसाठी कुकडी पाणलोट क्षेत्रातील १.२० अब्ज घनफूट इतके पाणी डावा कालवा मधून भोसे खिंड बोगद्याद्वारे सीना धरणात व १.२० अब्ज घनफूट पाण्यापैकी ०.५० अब्ज घनफूट पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे मेहेकरी धरणात येण्याची सीना धरणातून उपसा सिंचन योजनेद्वारे मेहकरी धरणातील पाण्याची स्रोत वृद्धि सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालात तरतूद आहे. सद्यस्थितीत कुकडी डावा कालव्याद्वारे सीना मध्यम प्रकल्पात ६४५.११ एमसीएफटी पाणी सोडण्यात आले असून त्या प्रमाणात २५८.०४ एमसीएफटी पाणी मेहकरी योजनेमध्ये घेणे शक्य असल्याचे आजबे म्हणाले.यावेळी डॉ. शिवाजी राऊत, किशोर हंबर्डे, काकासाहेब शिंदे, आण्णासाहेब चौधरी, अ‍ॅड. पंढरीनाथ पारखे, जगन्नाथ ढोबळे, पोपट गर्जे, बबन रांजणे, सुरेश पवार उपस्थित होते.

टॅग्स :DamधरणWaterपाणी