शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बहुप्रतीक्षित परळी एमआयडीसी उभारणी प्रक्रियेला पंकजा मुंडे व उद्योगमंत्र्यांच्या बैठकीमुळे आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 16:52 IST

परळी  येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी उभारणीच्या हालचालींनी प्रशासकीय पातळीवर पुन्हा एकदा वेग घेतला आहे.

ठळक मुद्देपालकमंञी पंकजा मुंडे यांनी या बैठकीत एमआयडीसी उभारणीसाठी आग्रही भूमिका मांडली. उद्योगमंत्री देसाई यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जागेची पाहणी करून पुढील कार्यवाही त्वरेने करण्याचे निर्देश दिले.

बीड : परळी  येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी उभारणीच्या हालचालींनी प्रशासकीय पातळीवर पुन्हा एकदा वेग घेतला आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा बीडच्या पालकमंञी पंकजा मुंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. आज मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत यासंदर्भात एक बैठक पार पडली.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी  उपमुख्यमंत्री असतांना परळी तालुक्यातील नाथ्रा येथे एमआयडीसी मंजूर करून घेतली होती. सन १९९७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते याचे भूमिपूजन देखील झाले होते. परंतू त्यावेळी   एमआयडीसी उभारणीला प्रचंड विरोध झाल्याने उभारणीची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती. आपल्या भागात उद्योगधंदे यावेत आणि हा भाग विकसित व्हावा हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न होते, परंतु सत्ता नसल्याने ते पुर्ण झाले नव्हते, आता पालकमंञी पंकजा मुंडे यांनी त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पुढाकार घेऊन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत त्यांच्या मंत्रालयातील दालनात आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शेट्टी व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

सोमवारी करणार जागेची पाहणी पालकमंञी पंकजा मुंडे यांनी या बैठकीत एमआयडीसी उभारणीसाठी आग्रही भूमिका मांडली. उद्योगमंत्री देसाई यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जागेची पाहणी करून पुढील कार्यवाही त्वरेने करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार येत्या सोमवारी म्हणजे ६ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी चे अधिकारी परळी येथे येऊन वरवटी, गाढे पिंपळगांव, वडखेल येथे जागेची व इतर आवश्यक बाबीची पाहणी करणार आहेत. दरम्यान, या बैठकीमुळे एमआयडीसी उभारणीला पुन्हा वेग आल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेMIDCएमआयडीसीSubhash Desaiसुभाष देसाई