शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या ‘उभारी’साठी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:33 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत उभारी उपक्रमाची बैठक जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शेतक-यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागणीप्रमाणे योजनांचा लाभ तात्काळ देण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित विभागातील अधिका-यांना दिल्या.

ठळक मुद्देविविध विषयांचा परामर्ष : मागणीप्रमाणे शासकीय योजनेचा लाभ देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत उभारी उपक्रमाची बैठक जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शेतक-यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागणीप्रमाणे योजनांचा लाभ तात्काळ देण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित विभागातील अधिका-यांना दिल्या.बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी कांबळे, जिल्हा कृषी अधीक्षक एम.एल. चपळे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती होती.आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना देण्यात येणाºया कौशल्य विकास, आरोग्य विषयक उपचार, कर्ज, वैरण विकास, शेती व घरामध्ये वीज जोडणी, विहीर, शेत तळे, गॅस जोडणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शुभ मंगल सामूहिक विवाह योजना, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, शौचालय, घरकुल, जनधन बँक खाते, कुटुंब अर्थ सहाय्य योजना, संगयो अंतर्गत वेतन या योजनांची मागणी केलेल्या प्राप्त कुटुंबियांची संख्या व त्यांना देण्यात आलेल्या योजनेच्या लाभाच्या माहितीचा तालुकानिहाय आढावा घेवून प्रलंबित योजनेचा लाभ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना तात्काळ देण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांच्या मागणीनुसार त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाºयांनी तालुकास्तरावर बैठका घेवून या कामाचा आढावा घ्यावा. ज्या कुटुंबांनी विहीर, शेततळे, शैक्षणिक मदत, घरकुल यासारख्या बाबींची मागणी केली आहे त्या योजनेचा लाभ देण्यासाठी नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे सांगत आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना उभे करण्यासाठी जास्तीत जास्त योजनेचा लाभ त्यांना देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी अधिकारी व कर्मचाºयांना केल्या. या बैठकीस जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्याcollectorजिल्हाधिकारी