शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या प्रश्नांसाठी मेळावा; छगन भुजबळ करणार मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:24 IST

ओबीसींच्या प्रश्नांवर आ. छगन भूजबळ पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातील पहिला समता मेळावा बीड येथे होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ओबीसींच्या प्रश्नांवर आ. छगन भूजबळ पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातील पहिला समता मेळावा बीड येथे होत असून ओबीसींच्या प्रश्नांसह आगामी वाटचालीची सिंहगर्जना ते या मेळाव्यातून करणार असल्याने ओबीसी, बहुजन समाज बंधू- भगिनींसह पुरोगामी विचारधारेवर प्रेम असलेल्या बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी केले आहे.२९ सप्टेंबर १८ राजी दुपारी ४ वाजता बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात होणार असलेल्या भव्य समता मेळाव्याच्या पूर्वतयारी संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बापूसाहेब भुजबळ हे बोलत होते.यावेळी मेळाव्याचे संयोजक तथा समता परिषदेचे विभागीय आणि बीड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष राऊत यांनी मेळाव्याची भूमिका विषद करु न आ. छगनराव भुजबळ यांनी राज्यातील पहिला मेळावा बीड येथे नियोजीत केल्याबद्दल आभार व्यक्त केले. ओबीसी समूहाच्या प्रश्नांबाबत रात्रंदिवस झगणाऱ्या ओबीसींचे दैवत आ.भुजबळ यांची आगामी वाटचालीची भूमिका ऐकण्यासाठी बीड जिल्ह्यातील जनतेने लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राऊत यांनी केले.या पत्रकार परिषदेस माळी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण गुंजाळ, कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे, परीट समाजाचे विभागीय अध्यक्ष गणेश जगताप, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन साखरे, शहराध्यक्ष निखील शिंदे, यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीChhagan Bhujbalछगन भुजबळ