शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

एम.डी.सिंह यांची बदली; आस्तिककुमार पांडेय नवे जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:45 IST

जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांची बुधवारी बदली झाली असून, त्यांच्या जागी अकोल्याचे जिल्हाधिकारी डॉ.आस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांची बुधवारी बदली झाली असून, त्यांच्या जागी अकोल्याचे जिल्हाधिकारी डॉ.आस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बुधवारी राज्यातील विविध विभागातील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या यामध्ये बीडचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांची माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक पदावर बदली झाली. त्यांच्या जागेवर अकोला येथील जिल्हाधिकारी डॉ. आस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ बीड येथे रुजू होण्याचे आदेश अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी दिले आहेत.दुष्काळी परिस्थिती, राजकीय दबाव व प्रशासनातील अधिका-यांची रिक्त पदे अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील एम.डी.सिंह यांनी जिल्ह्यातील नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नियोजबद्ध कामकाज करण्याचा नेहमी प्रयत्न केला.ी एम. डी. सिंह यांच्या जागेवर अकोला येथील जिल्हाधिकारी डॉ. आस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती झाली आहे.अकोला जिल्ह्यात त्यांनी विविध योजना अतिशय प्रभावीपणे राबवल्या होत्या. यामध्ये नदी स्वच्छता, जलसंधारणाची कामे व शेतकºयांना उपयुक्त असणाºया कामांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. अकोला जिल्ह्यातील मोरणा नदी मृत झाली होती. तसेच त्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी लोकसहभागातून मोरणा नदीची स्वच्छता करुन पुन्हा नदी जिवंत केली आहे.बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून, नापिकी, पाणी संकट व शेतक-यांची परिस्थिती सुधारण्याचे कठीण आव्हान पांडेय यांच्यासमोर राहणार आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच येणा-या निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्याची कठीण जबाबदारी पांडेय यांना पेलावी लागणार आहे.

टॅग्स :Beed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडcollectorजिल्हाधिकारीTransferबदली