शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धर्म की जय हो, अधर्म का नाश हो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:28 IST

धर्म की जय हो, अधर्म का नाश हो’ अशा जयघोषात शनिवारी गोरज मुहुर्तावर दाक्षिणाम्नाय शारदपीठ (कर्नाटक) जगद्गुरु शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती यांची शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. घोडेस्वार, महिलांचे ढोल पथक, आदर्श विद्यालयाचे लेझीम पथक, दशावतार, फेटेधारी महिलांचा सहभाग आणि वाद्यवृंदाच्या सुरात वातावरण चैतन्यमय बनले होते.

ठळक मुद्देजगद्गुरु शंकराचार्यांचे बीडमध्ये उत्स्फूर्त स्वागत

बीड : ‘धर्म की जय हो, अधर्म का नाश हो’ अशा जयघोषात शनिवारी गोरज मुहुर्तावर दाक्षिणाम्नाय शारदपीठ (कर्नाटक) जगद्गुरु शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती यांची शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. घोडेस्वार, महिलांचे ढोल पथक, आदर्श विद्यालयाचे लेझीम पथक, दशावतार, फेटेधारी महिलांचा सहभाग आणि वाद्यवृंदाच्या सुरात वातावरण चैतन्यमय बनले होते.भारत विजय यात्रेनिमित्त जगद्गुरु शंकराचार्य श्रीविधुशेखर भारतींचे सायंकाळी आगमन झाल्यानंतर बलभीम चौकातून शोभायात्रेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी संयोजन समितीचे अ‍ॅड. कालीदास थिगळे, वे.शा.सं. धुंडीराजशास्त्री पाटांगणकर, हभप भरतबुवा रामदासी, नामदेवराव क्षीरसागर, वे.शा.सं. अमोलशास्त्री जोशी, डॉ. दिलीप देशमुख, दिलीप खिस्ती, दुर्गादासगुरु जोशी, एकनाथ महाराज पुजारी आदींच्या हस्ते स्वामीजींचे स्वागत करण्यात आले. भव्य दिव्य सजवलेल्या रथात स्वामीजी विराजमान होताच धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, भारतमाता की जय असा जयघोष करण्यात आला.दिमाखदार फेटा, लेझीम पथकया शोभायात्रेत ब्रम्हतेज, आदिशक्ती, जिओ गीता, राधे राधे, विठोबा रुखमाई आदी महिला मंडळाच्या महिला डोक्यावर मंगल कलश, फेटे बांधून उत्स्फूर्तपणे सहभागी होत्या. शोभायात्रेत सहभागी पुरोहित पारंपरिक वेशभूषा परिधान करुन मंत्र जयघोष करत होते.आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीप्ती औटी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने जयोस्तुते व इतर देशभक्तीपर गीतांवर प्रात्यक्षिके सादर केली. रोहिणी बाभुळगावकर यांनी दशावतार तर अनुराधा खरवडकर यांच्या प्रयत्नांतून विविध संत महंत, राष्टÑभक्तांची वेशभूषा साकारलेले विद्यार्थी शोभायात्रेत सहभागी होते. बलभीम चौक, धोंडीपुरा, माळीवेस, सुभाष रोड, सिद्धीविनायक संकुल मार्गे सहयोगनगर येथील सर्वेश्वर गणपती मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. तेथे मंदिर विश्वस्तांच्या वतीने स्वामीजींचे स्वागत व त्यानंतर त्यांच्या हस्ते श्री गजाननाचे पूजन करण्यात आले. शोभायात्रेच्या सांगतेनंतर औटी मंगल कार्यालयात श्री चंद्रमौलीश्वर परमेश्वर पुजा करण्यात आली.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम