शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अन्याय अत्याचाराविरुद्ध मातंग समाजाचा ‘बहिष्कार मोर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:11 IST

अण्णाभाऊ साठे जयंती राज्यभरात उत्साहात साजरी होत असताना, बीड शहरात मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पिपल्स डेमोक्रॅटीक पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बहिष्कार मोर्चा काढण्यात आला.

बीड : अण्णाभाऊ साठे जयंती राज्यभरात उत्साहात साजरी होत असताना, बीड शहरात मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पिपल्स डेमोक्रॅटीक पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बहिष्कार मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ््यास अभिवादन करुन या बहिष्कार मोर्चाची सुरुवात झाली, सुभाष रोड मार्गे शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ््यास हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, यावेळी मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे हे करत होते. यावेळी ते म्हणाले, गुलामाला गुलामीची जाणिव करुन दिली पाहिजे तरच तो समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील, राज्यातील अनेक गावांमध्ये विविध कारणांवरुन समाजावर अन्याय होत आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे अन्यथा मोठ्या संख्येने मुंबई येथील विधीमंडळावर मातंग समाजाचा मोर्चा काढला जाईल. पुढे बोलताना ते म्हणाले समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व महामंडळाचे कर्ज माफ करुन पुन्हा कर्जाचे वाटप करण्यात यावे, उद्योग व्यावसायला चालना देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे, होणार अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी,यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व महिला, पुरुष तसेच युवक मोर्चात सहभागी झाले होते.हेच आमचे अभिवादन - अजिंक्य चांदणेराज्यात अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. मात्र, ते ज्या समाजातून आले त्या समाजावर विहिरीत पोहल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे अन्याय अत्याचार होत असेल तर जयंती उत्सहात साजरी कशी करावी त्यामुळेच या बहिष्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून हेच आमचे अभिवादन आहे, असे मत चांदणे यांनी यावेळी व्याक्त केले.

टॅग्स :BeedबीडagitationआंदोलनMorchaमोर्चा