शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मस्साजोगमध्ये चोरांचा धुमाकूळ; एकाच रात्री ठिकाणी ६ घरफोडी, दागिने-रोकडसह केबल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 20:02 IST

पोलीस अधीक्षक आणि श्वान पथक घटनास्थळी; पण ग्रामपंचायतीचे १८ कॅमेरे बंद असल्याने चोरांचा मार्ग मोकळा.

केज (बीड): तालुक्यातील मस्साजोग येथे गुरुवारी (९ एप्रिल) रात्री चोरट्यांनी हैदोस घालत एकाच रात्री सहा घरांची कुलपे फोडली. या घरफोडीत २५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ८५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, चोरट्यांनी गावातील तलावावरील ४० शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारींच्या तांब्याच्या केबलवरही डल्ला मारला आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

कुठे कुठे झाली चोरी?घरफोडीची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप मांजरमे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. चोरट्यांनी अच्युत देशमुख यांच्या घरातून १० ग्रॅम सोने व ३० हजार रोख, प्रवीण देशमुख यांच्याकडून ४० हजार रोख, तर भागवत सोळुंके यांच्या घरातून १५ ग्रॅम सोने व २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. याशिवाय धनंजय देशमुख, नितीन देशमुख आणि बाळासाहेब देशमुख यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला, मात्र घरातील लोक जागे झाल्याने चोरटे पसार झाले.

प्रशासनाचा बेजबाबदारपणा: कॅमेरे फक्त नावाचेच!तपासादरम्यान एक गंभीर बाब समोर आली आहे. गावात सुरक्षेसाठी डिसेंबर २०२५ मध्ये १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय गव्हाणे यांनी हे सर्व कॅमेरे सध्या बंद असल्याची कबुली दिली. "कॅमेरे सुरू असते तर चोरांचा माग काढणे सोपे झाले असते," अशी खंत पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने यांनी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Theft spree in Massajog: Six houses burgled, valuables stolen.

Web Summary : Thieves targeted Massajog, burgling six houses and stealing gold, cash, and copper cables. Police are investigating. CCTV cameras, installed for security, were reportedly non-functional, hindering the investigation.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या