अंजली शशिकांत सोनवणे हिला तिचे लग्न झाल्यापासून तिचे सासर डिघोळआंबा येथे एक महिन्यापर्यंत चांगले नांदवले. त्यानंतर घराचे कर्ज फेडण्यासाठी व गाडी घेण्यासाठी माहेरहून २२ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून उपाशीपोटी ठेवून जाचजुलूम केला. तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला आणि जीवे मारण्याची धमक्या दिली.
या फप्रकरणी पीडित अंजली शशिकांत सोनवणे हिच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात तिचा नवरा शशिकांत नवनाथ सोनवणे, सासू संगीता नवनाथ सोनवणे आणि सासरे नवनाथ गोविंद सोनवणे रा. डिघोळअंबा ता. अंबाजोगाई यांच्याविरुद्ध गु.र.नं.३५९/२०२१ भा.दं.वि. ४९८ (अ), ३२३,५०४, ५०६ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनकर पुरी हे तपास करीत आहेत.