शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

'आधी मराठा आरक्षण, नंतर निवडणूक'; ग्रामपंचायत निवडणुकीवर उमरी ग्रामस्थांचा बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 19:09 IST

एकही उमेदवार अर्ज भरणार नाही, उमरी ग्रामस्थांनी केला एकमुखी ठराव

माजलगाव (बीड) : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक नाही, अशी भूमिका घेत उमरी ग्रामस्थांनी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले.निवडणुकीत एकही उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत, असे लेखी निवेदन तहसीलदार यांना ग्रामस्थांनी दिले आहे.

उमरी येथील आज सकाळी ११ वाजता ग्रामस्थ,पॅनल प्रमुख व सरपंच पदाचे उमेदवार यांची एकत्रित बैठक झाली. यात एकमुखी ठराव घेतला की, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार असेल. गावातील एकाही उमेदवाराने अर्ज दाखल करायचा नाही. अशा  प्रकारे ठराव घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकणारे उमरी ही गाव राज्यातील एकमेव ठरले आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका स्थगित करा, जर निवडणुका घेतल्या तर उमरी येथील एकही उमेदवार निवडणूकीत उमेदवारी दाखल करणार नसल्याचा निवेदन उमरी ग्रामस्थांनी दिले. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दोन दिवसानंतरही एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. 

गाव पातळीवर निर्णय घ्यावातालुक्यातील ४२ ग्रामपंचायतचा  निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.गावातील उमेदवारांनी गाव पातळीवर निर्णय घेऊन निवडणूक लढवावी. राजकारणामध्ये कधीही मराठा क्रांती मोर्चा सामील झाला नाही व सामील होणार नाही. - राजेंद्र होके पाटील, मराठा क्रांती मोर्चा बीड

लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावेराज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकांनी सहभाग नोंदवावा. निवडणुका ठरवलेल्या वेळेतच होत असतात. निवडणुकीवर बहिष्कार न टाकता सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन लोंकानी निवडणुका लढवाव्यात.-वर्षा मनाळे, तहसीलदार माजलगाव

टॅग्स :BeedबीडElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत