शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण, कर्जबाजारीपणामुळे तरूणाने संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 16:58 IST

मराठा समाजाला आरक्षण नसल्याने सुशिक्षित असूनही नौकरी लागत नाही. त्यातच नापिकीमुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून २० वर्षीय तरूणाने सात दिवसांपूर्वी विषारी द्रव  प्राशन केले होते.

बीड : मराठा समाजाला आरक्षण नसल्याने सुशिक्षित असूनही नौकरी लागत नाही. त्यातच नापिकीमुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून २० वर्षीय तरूणाने सात दिवसांपूर्वी विषारी द्रव प्राशन केले होते. ही घटना वडवणी तालुक्यातील मामला येथे घडली होती. उपचारादरम्यान त्याचा आज सकाळी जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा रूग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

दत्ता अनंत लंगे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.  कर्जबारीपणा, नैराश्य, शेतीमालाला कमी भाव, नापीकी आदी समस्यांनी शेतकरी आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दत्ता लंगे याला दोन एकर शेती आहे. बहिणीचे लग्न व शेतीत  पेरणी करण्यासाठी वडवणीतील बँकेचे कर्ज घेतले होते. नापिकीमुळे हे कर्ज कसे फेडायचे. त्यातच आपण सुशिक्षित असतानाही केवळ मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नौकरी लागत नाही, त्यामुळे तो विंवचनेत होता. यातूनच त्याने सात दिवसांपूर्वी विषारी द्रव प्राशन केले. नातेवाईकांनी त्याला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. सात दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली.

दुर्दैवाने शनिवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नातेवाईकांनी कर्ज व मराठा समाजाला आरक्षण नसल्याने दत्ता विवंचनेत होता, त्यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचा जबाब जिल्हा रूग्णालय पोलीस चौकीत दिला आहे. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद झाल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSuicideआत्महत्याBeedबीड