शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

मनोज जरांगेंची रणनीती; उपोषणाला बसताच अंतरवालीपासून यात्रा, ३ कोटी मराठे मुंबईत येणार

By सोमनाथ खताळ | Updated: December 23, 2023 17:52 IST

मनोज जरांगे पाटलांचे ठरलं! २० जानेवारपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण, आरक्षण भेटल्याशिवाय माघारी परतणार नाहीच 

बीड : सरकारने आतापर्यंत केवळ वेळ मागितला. परंतू आरक्षणावर काहीच निर्णय घेतला नाही. परंतू आता बस झाले. २० जानेवारपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहे. मला भेटण्यासाठी राज्यातील तीन कोटी मराठे येणार आहेत. त्यांना आडवून दाखवा असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर मनाेज जरांगे पाटील ठाम आहेत. सरकारला दिलेली मुदत २४ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी २३ डिसेंबरला बीडमध्ये जरांगे-पाटील यांची बीडमध्ये निर्णायक इशारा सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. आमच्या मराठ्यांच्या लेकरांना खोटे गुन्हे दाखल करून अडकवले. हे सरकारचे षडयंत्र आहे. लेकरांचे मुडदे पडत असताना सरकार हसत आहे. याच्या खुप वेदना होतात. तसेच आरक्षणासाठी सरकारने सुरूवातीला तीन महिने, ४० दिवस नंतर आता २४ डिसेंबरपर्यंत वेळ मागितला. परंतू काहीच निर्णय घेतला नाही. मग आम्ही कुठपर्यंत थांबणार? आम्हालाही मर्यादा आहेत. परंतू आता सहनशिलता संपली आहे. त्यामुळे तयारीला लागा. २० जानेवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहे. मला भेटायला राज्यातील तीन कोटी मराठे येणार आहेत, त्यांना अडवून दाखवा? असे म्हणत सरकाला इशारा दिला आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत माघारी येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

अंतरवाली ते मुंबई पायी यात्रामी उपोषणाला बसल्यानंतर अंतरवाली ते मुंबई असा पायी यात्रा निघेल.त्याचा मार्ग ठरविण्यात येईल. परंतू सर्वांनी जसे जमेल तसे, जवळ असलेल्या ठिकाणाहून यात सहभागी व्हावे. सर्वांनी आपआपली शेतातील, घरची कामे २० जानेवारीपर्यंत करून घ्यावीत. एकदा निघाल्यावर आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी परतायचेच नाही, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

३ कोटी मराठे मुंबईत येणारमी उपोषण करत आहे. परंतू मला भेटायला राज्यातील ३ कोटी मराठे येणार आहेत. जेवण, अंथरून-पांघरूनाची ते स्वता: व्यवस्था करतील. पण त्यांच्या नैसर्गिक विधीची व्यवस्था सरकारने करावी. अन्यथा ते कुठेही बसतील. जर घाण झाली तर आम्ही जबाबदार राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :BeedबीडMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील