शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल बाळगणारा अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:29 IST

जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल सोबत बाळगणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराच्या मित्रास बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्री बीड शहरातील बार्शी रोडवर केली.

ठळक मुद्देस्थागुशाची कारवाई : दहशत निर्माण करून गुन्हा करण्याची तयारी फसली

बीड : जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल सोबत बाळगणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराच्या मित्रास बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्री बीड शहरातील बार्शी रोडवर केली. दहशत निर्माण करून गुन्हा करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.राहुल प्रकाश तुपे (२२ रा.गोविंदनगर, बीड) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. राहुलने चार वर्षापूर्वी माळीवेस भागात गिफ्ट शॉपी टाकली होती. मात्र यामध्ये तोट्यात गेला. याचदरम्यान त्याची याच भागातील एका कुख्यात आरोपीसोबत मैत्री झाली. सहा महिन्यापूर्वी त्याने दुकान बंद केले. व्यसनाची सवय लागल्याने त्याला पैशाची चणचण जाणवू लागली. तीन महिन्यापूर्वी त्याने आपल्या मित्राकडून गावठी पिस्तूल २५ हजार रूपयांचा विकत घेतला. याच पिस्तुलाचा धाक दाखवून तो खंडणी व इतर गंभीर गुन्हे करण्याची तयारी करीत होता.दरम्यान, राहुल हा आपल्या मित्रांसमवेत बार्शी रोडवरील एका हॉटेलमध्ये गावठी पिस्तूलजवळ बाळगून मद्यपान करीत असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना समजले. त्यांनी तात्काळ सपोनि दिलीप तेजनकर आणि टिमला पाठविले. अचानक धाड टाकून पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर श्रीमंत उबाळे यांच्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, गणेश दुधाळ, विष्णू चव्हाण, शेख नसीर, सुग्रीव रूपणर, नरेंद्र बांगर, श्रीमंत उबाळे आदींनी केली.

टॅग्स :BeedबीडArrestअटकBeed policeबीड पोलीस