शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर - मांडवा रस्त्याचे काम तीन महिन्यांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:48 IST

परळी शहरापासून जवळच असलेल्या मलकापुर रोड ते मरळवाडी, मांडवा रोडच्या डांबरीकरणासाठी ७९ लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. चार किलोमिटरपैकी अडीच किलोमिटरचे काम झालेले आहे. उर्वरित काम तीन महिन्यांपासून केले नसल्याने मलकापूर, मरळवाडी, मांडवा या गावच्या वाहनधारकांना रस्त्यावरुन येता जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थात असंतोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देउपकार्यकारी अभियंता अंबाजोगाईहून हाकतात परळीचा कारभार; ७९ लाख रुपयांचा निधी नावालाच

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : शहरापासून जवळच असलेल्या मलकापुर रोड ते मरळवाडी, मांडवा रोडच्या डांबरीकरणासाठी ७९ लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. चार किलोमिटरपैकी अडीच किलोमिटरचे काम झालेले आहे. उर्वरित काम तीन महिन्यांपासून केले नसल्याने मलकापूर, मरळवाडी, मांडवा या गावच्या वाहनधारकांना रस्त्यावरुन येता जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थात असंतोष निर्माण झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम खाजगी एजन्सी देण्यात आले आहे. मलकापूर ते मांडवा रोडवर झालेले अर्धवट कामही दर्जेदार नाही. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. उर्वरित कामही केले नाही, असा आरोप मलकापूर येथील महादेव फुलचंद गीत्ते यांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता कार्यालय परळीच्या शिवाजी चौकाजवळच इमारतीत आहे. परंतु याठिकाणी उपकार्यकारी अभियंता कधी आलेले दिसतच नाहीत. उपकार्यकारी अभियंता काकड हे अंबाजोगाई येथूनच कारभार हाकतात. त्यामुळे परळीतील कामे वेळेवर होत नसून दर्जेदारही होत नाहीत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही वरिष्ठांनी याची दखल घेतली नाही, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

काम पुर्ण करण्यासाठी एजन्सीला नोटीस - काकडेयासंदर्भात उपकार्यकारी अभियंता एस.बी.काकड म्हणाले की, मलकापूर ते मांडवा रस्त्याचे काम पूर्ण करावे, यासाठी संबंधित एजन्सीला नोटीस देण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात हे काम सुरु करण्यात येईल. अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात परळीच्या उपविभागाचे काम असते. त्यामुळे आपण काही दिवस परळीत तर काही दिवस अंबाजोगाईत असतो, असे स्पष्टीकरण एस. बी. काकडे यांनी दिले आहे.

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाpwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा