शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:50 IST

राज्य शासनाने प्लास्टिकबंदीबाबत अधिनियम करूनही बंदी घातलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर व विक्री सुरू आहे. त्यामुळे नगरपालिकेने या प्लास्टिकबंदीच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबाजवणी करावी, अशी मागणी बुधवारी पर्यावरणप्रेमींनी येथील मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

अंबाजोगाई : राज्य शासनाने प्लास्टिकबंदीबाबत अधिनियम करूनही बंदी घातलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर व विक्री सुरू आहे. त्यामुळे नगरपालिकेने या प्लास्टिकबंदीच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबाजवणी करावी, अशी मागणी बुधवारी पर्यावरणप्रेमींनी येथील मुख्याधिकाऱ्यांकडे केली.मागील २४ मे पासून येथील पर्यावरण प्रेमी नागरिक बुट्टेनाथ-नागनाथ परिसरातील वाण-जयवंती नदीत प्लास्टिकमुक्त अभियान राबवित आहेत. या मोहिमेत रोज कमीत कमी एक टन प्लास्टिक व घनकचरा काढला जात आहे. बुट्टेनाथ नागनाथ मुकुंदराज भागातील समृद्ध जैवविविधता आपल्या शहरातील अनिर्बंध प्लास्टिकचा वापर व प्लास्टिक कचरा, घनकचरा यामुळे धोक्यात आलेले आहे. शहरामध्ये कचरा जाळण्याचे प्रचंड प्रमाण असून त्याबाबत घनकचरा व्यवस्थापन नियमन अंतर्गत कडक दंडात्मक कारवाई करावी व अंबाजोगाई शहर प्लास्टिक व धूरमुक्त मुक्त करावे. अशीही मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी प्रा. अरूंधती पाटील, डॉ. नितीन चाटे, प्रवीण चोपडा, दत्ता देवकते, विजय रापतवार, महेश वेदपाठक, अनंत मलवाड, सत्येंदू रापतवार, आशिष राठोड, दिनेश शिंदे, डॉ. अविनाश मुंडे, अजय रापतवार, अ‍ॅड. ढेले, सुमेधा कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईPlastic banप्लॅस्टिक बंदी