शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव तालुका कृषी विभाग रिक्त पदांमुळे सलाईनवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 19:54 IST

प्रशासकीय अनास्थेमुळे बळीराजाला अतोनात त्रास

ठळक मुद्देशेतकरी बांधवांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. तीन मंडळांत ६७ जागा रिक्त

- राजाभाऊ पास्टेगंगामसला (बीड ) : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असतानाच दुसरीकडे प्रशासकीय अनास्थेमुळे बळीराजाला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या पद रिक्ततेमुळे शेतकरी बांधवांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. 

माजलगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील १३ जागांसह तालुक्यातील तीन कृषी मंडळामध्ये २९ जागा रिक्त आहेत. यात मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या ३ पैकी २ जागांचा तर कृषी सहाय्यकांच्या २२ जागांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून या जागा रिक्त असल्याने शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहेत. एकूण ६७ पदांपैकी २५ पदे भरलेली असून ४२ पदे रिक्त आहेत. तालुक्यात एकूण ६७ पदांपैकी ४२ पदे रिक्त असल्यामुळे आता खरीप हंगाम आहे. मात्र कृषी विभाग सलाईनवर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

अशी आहेत रिक्त पदेतालुका कृषी कार्यालय २२ विविध पदे, १३ पदे रिक्त आहेत, सहायक अधीक्षक १, कृषी सहायक १, कृषी पर्यवेक्षक १,  लिपिक ३, अनुरेखक २, जीप चालक १, शिपाई ४, कृषी मंडळ माजलगाव १५ पदे मंजूर, रिक्त पदे ९, कृषी पर्यवेक्षक १, कृषी सहायक ८,  कृषी मंडळ गंगामसला १५ पदे मंजूर, रिक्त पदे ८, कृषी अधिकारी १, कृषी पर्यवेक्षक २, कृषी सहायक ५ रिक्त आहेत, कृषी मंडळ केसापुरी १५ पदे मंजूर, रिक्त पदे १२, कृषी अधिकारी १, कृषी पर्यवेक्षक २, कृषी सहायक ९ जागा रिक्त आहेत.

६७ जागांना शासनाची मंजूरी

माजलगाव तालुका दुष्काळी असल्यामुळे येथील शेतकरी दृष्काळाशी नेहमी संघर्ष करीत आहे. या परिस्थितीत येथील कृषी विभाग मात्र सलाईनवर आहे. शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी, यासाठी तालुक्यात तालुका कृषी कार्यालयासह तीन कृषी मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. यात माजलगाव, गंगामसला, केसापुरी या मंडळाचा समावेश आहे. या सर्व मंडळात एकूण ६७ जागांना शासनाची मंजूरी आहे. तालुका कार्यालयातील १३ व माजलगाव मंडळ ९, गंगामसला मंडळ ८, केसापुरी मंडळ १२ अशा  एकूण ४२ जागांची आवश्यकता आहे. माजलगाव, गंगामसला मंडळासह  सर्वाधिक जागा केसापुरी मंडळात रिक्त असल्याने त्या २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत असून, यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहवे लागत आहे. रिक्त जागांमुळे माजलगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील १३ जागांसह तालुक्यातील तीन कृषी मंडळात २९ जागा रिक्त आहेत. या जागा रिक्त असल्यामुळे शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.

शासनाच्या प्रयत्नांना रिक्त जागांमुळे सुरूंगतालुक्यात मंडळ कृषी अधिकाऱ्यांची ३ पदे असून गंगामसला व केसापुरी येथील पदे रिक्त आहेत. तालुका कृषी कार्यालयात असलेले एकमेव सहायक अधीक्षकांचे पद देखील रिक्त आहे. तसेच लिपिकपदाच्या ५ जागा मंजूर असून ३ पदे रिक्त आहेत. शेतकऱ्यांसाठी शासनाने आणलेल्या नवीन योजनांची माहिती पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम असलेल्या कृषी सहाय्यकांच्या ३७ पदांपैकी २३ पदे रिक्त आहेत, त्यामुळे शासनाच्या कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यत पोहचत नाही. शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे नेण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना रिक्त जागांमुळे सुरूंग लागल्याची स्थिती तालुक्यात झालेली आहे. शेतकरी अनेक योजनांबाबात अनभिज्ञ आहेत. शासनाकडून नोकर भरती बंद असल्याचा फटका कृषी कार्यालयाला बसत आहे.

तीन मंडळांत ६७ जागा रिक्ततालुक्यात तालुका कृषी कार्यालयासह तीन कृषी मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. यात माजलगाव, गंगामसला, केसापुरी या मंडळाचा समावेश आहे. या सर्व मंडळात ६७ जागांना शासनाची मंजुरी आहे. तालुका कार्यालयातील १३ व माजलगाव मंडळ ९, गंगामसला मंडळ ८, केसापुरी मंडळ १२ अशा एकूण ४२ जागांची आवश्यक आहे. माजलगाव, गंगामसला मंडळासह सर्वाधिक जागा केसापुरी मंडळात रिक्त असल्याने त्या २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत असून, यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रBeedबीड