शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव पंचायत समितीचा कारभार चालतो ५० वर्ष जुन्या जीर्ण इमारतीमधून; बांधकाम निधी अडकला लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 18:19 IST

तालुक्याच्या  पंचायत समिती कार्यालयाची इमारतीचे आयुष्यमान ५० वर्ष आहे. आता ही इमारतीत जीर्ण झाली असून मोडकळीस आली आहे. नवीन इमारत व कर्मचारी निवासस्थानासाठीचा निधी 2 वर्षांपूर्वीच मंजूर आहे. असे असताना केवळ टेंडरच्या काढण्याच्या दिरंगाईमुळे बांधकामास मुहूर्त लागत नसल्याने कर्मचा-यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. 

ठळक मुद्देमाजलगाव पंचायत समितीची इमारत व कर्मचारी निवासस्थाने ही 1967 साली उभारण्यात आली होती. नव्या इमारत व कर्मचा-यांच्या निवासस्थानासाठीचा ९ कोटी रूपयांचा निधी १६ फेब्रुवारी २०१६ लाच मंजुर झाला आहे.

माजलगाव, ( बीड ) : तालुक्याच्या  पंचायत समिती कार्यालयाची इमारतीचे आयुष्यमान ५० वर्ष आहे. आता ही इमारतीत जीर्ण झाली असून मोडकळीस आली आहे. नवीन इमारत व कर्मचारी निवासस्थानासाठीचा निधी 2 वर्षांपूर्वीच मंजूर आहे. असे असताना केवळ टेंडरच्या काढण्याच्या दिरंगाईमुळे बांधकामास मुहूर्त लागत नसल्याने कर्मचा-यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. 

माजलगाव पंचायत समितीची इमारत व कर्मचारी निवासस्थाने ही 1967 साली उभारण्यात आली होती. या इमारतीस 50 वर्षे उलटली असून प्रशासकिय इमारत व निवासस्थानाची दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळे प्रशासकिय कामे करतांना कर्मचार्‍यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात छत जागोजागी  गळत असते. यामुळे कित्येकदा इमारतीमधील महत्वाची दस्तावेज भिजलेली पहावयास मिळतात. सध्या शासकिय योजनाचा मोठ्या प्रमाणात काम ऑनलाईन झाली आहेत. मात्र येथे सुसज्ज व स्वतंत्र संगणक कक्ष नसल्याने नागरिकांना मोठी गैरसोय होते. यासोबतच जीर्ण झालेली हे इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे येथील कर्मचारी जीव मुठीत घेवून कामकाज करावे लागते. 

निधी आहे मंजूर इमारत व कर्मचा-यांच्या निवासस्थानासाठीचा ९ कोटी रूपयांचा निधी १६ फेब्रुवारी २०१६ लाच मंजुर झाला आहे. मात्र, या कामाचे टेंडर जिल्हा परिषदेने अद्याप काढले नसल्याने निधी असूनही बांधकामास दिरंगाई होत आहे. याचा फटका मात्र नागरिकांसोबतच येथील कर्मचा-यांना बसत आहे. अनेक कर्मचा-यांना ही जीर्ण अवस्थेतील निवासस्थाने सोडून इतरत्र भाड्याने राहण्याची वेळ आलेली आहे. 

जिल्हा परिषद प्रशासनाची उदासीनता निधी जिल्हा परिषदेकडे जमा झाला आहे. बांधकामाबाबत आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष व प्रशासकिय अधिकार्‍यांना वारंवार भेट देऊन पाठपुरावा केला आहे. मात्र तेथील प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे हे काम रखडले आहे.

 - अलका नरवडे, सभापती 

टॅग्स :Beedबीड