शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

माजलगावला शेतकरी- कारखानदारांच्या बैठकीत विष घेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:48 IST

उसाच्या प्रश्नावर होत असलेल्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाने हस्तक्षेप करत शेतकरी आणि कारखाना प्रतिनिधींची येथील तहसील कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत कारखाने भाव जाहिर करीत नसल्याने शेतकरी नेते गंगाभिषण थावरे यांनी विषारी द्रव प्राशन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

माजलगाव : उसाच्या प्रश्नावर होत असलेल्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाने हस्तक्षेप करत शेतकरी आणि कारखाना प्रतिनिधींची येथील तहसील कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत कारखाने भाव जाहिर करीत नसल्याने शेतकरी नेते गंगाभिषण थावरे यांनी विषारी द्रव प्राशन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

जयमहेश, छत्रपती आणि लोकनेते सुंदरराव सोळंके या कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु होऊन एक महिना उलटला तरी भाव जाहीर केलेला नाही. या विरोधात विविध शेतकरी संघटना तसेच शिवसेना आंदोलन करीत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

दरम्यान ऊस दरासंदर्भात तोडगा निघावा या हेतुने प्रशासनाने मंगळवारी येथील तहसील कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार एन.जी. जंपलवाड, साखर सहसंचालक औरंगाबाद यांचे प्रतिनिधी शेख रशीद, सहायक निबंधक एस.बी. घुले आदींसह कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून एम.डी. घोरपडे, आर.एस. शिंदे, गिरीश लोखंडे आदी उपस्थित होते.

तब्बल तीन तास चर्चा झाली. कारखान्यांचे प्रतिनिधी हे आडमुठे धोरण अवलंबित एफ.आर.पी. पेक्षा शंभर ते दीडशे रुपये जास्त भाव देऊ, म्हणून वेळ मारुन नेत होते. तर किमान मागीलवर्षी दिलेला २६०० रुपये भाव कारखान्यांनी जाहीर करावा या मागणीवर शेतकरी ठाम होते. कारखाने भाव जाहीर करीत नसल्याने गंगाभिषण थावरे यांनी आक्रमक होत तेथेच विष घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी व कारखाना प्रतिनिधींची भंबेरी उडाली. अखेर शेतकºयांंनीच त्यांच्याकडील बाटली हिसकावून घेत रोखले.आमदार देशमुखांच्या नावाने शेतक-यांची बोंबतालुक्यात आंदोलन व बैठक होत असताना येथील आ. आर.टी. देशमुख हे चकार शब्दही बोलत नाहीत. तसेच बैठकीला ते किंवा त्यांचे प्रतिनिधी कोणीच उपस्थित नाहीत म्हणून उपस्थित शेतकºयांनी निषेध करीत त्यांच्या नावाने भर बैठकीत बोंब मारली.