शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरण अद्यापही मृत साठ्यात; केवळ दीड मीटरने वाढली पाणीपातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 18:14 IST

जिवंत साठ्यात येण्यासाठी २ मिटर पाण्याची आवश्यकता

ठळक मुद्देअनेक वेळा परतीच्या पावसावर भरले होते धरणअडीच महिन्यात केवळ दिड मिटरच वाढली पाणी पातळी

- पुरूषोत्तम करवामाजलगाव :परतीचा पाऊस सुरू व्हायला काही दिवस बाकी असताना येथील माजलगाव धरणाची पाणी पातळी जिवंत साठयात येण्यासाठी दोन मिटर पाणी पातळीची आवश्यकता असुन अनेक वेळा हे धरण परतीच्या पावसाने भरले होते त्यामुळे हे धरण परतीच्या पावसावर भरेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे.

गेल्यावर्षी माजलगाव धरण परिसरात अत्यल्प पाऊस पडल्याने धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. हे धरण भरण्यासाठी ४३१.८० मीटर एवढे पाणी लागते.३० जुन रोजी या धरणाची पाणी पातळी ४२३.०० मीटर ऐवढी झाली होती. यावेळी धरणात ६६ दलघमी ऐवढाच पाणी साठा शिल्लक होता.या धरणात ४५४ दलघमी ऐवढा पाणी साठा आवश्यक असतो.मागील आठ दिवसात धरण क्षेत्रात थोडा फार पाऊस झाल्याने व पैठण येथील जायकवाडी धरणातुन १३ ऑगस्टपासुन सोडण्यात आल्याने ९४.४० दलघमी ऐवढा पाणी साठा शुक्रवारी सकाळी झाला होता.तर ४२४.३८  मीटर ऐवढी पाणी पातळी धरणात झाली होती.

हे धरण टक्केवारी येण्यासाठी ४२६.११ मीटर ऐवढा पाणी साठा आवश्यक असल्याने अद्याप हे धरण टक्केवारीत येण्यासाठी १.७३ मीटर पाणी आवश्यक आहे. धरणाची पाणी पातळी अद्याप १५.२६ टक्यांनी खालावलेलीच आहे. तर हे धरण भरण्यासाठी अद्याप ७.४२  मीटर पाण्याची आवश्यकता आहे.धरणात शुक्रवारी ७०० क्युसेक ऐवढी आवक होती.तर ३७ दलघमी ऐवढे पाणी आजपर्यंत धरणात आले आहे त्यात २२ दलघमी पाणी हे पैठण येथील जायकवाडी धरणातुन आले आहे तर १५ दलघमी पाणी केवळ पावसाचे असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता बी.आर.शेख यांनी दिली.

परतीच्या पावसाची आशामागील दहा वर्षात अनेक वेळा माजलगाव धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. मात्र , अनेक वेळा परतीच्या दोन-तीन पावसातच हे धरण भरले होते. त्याचप्रमाणे याही वर्षी हे धरण परतीच्या पावसावर भरेल अशी आशा शेतकरी वर्गातून होत आहे. हवामान खात्याने या आठवड्यात जोरदार पाऊस पडेल अशी आशा व्यक्त केल्याने हे धरण नक्कीच भरेल अशी आस सर्वांना लागली आहे.

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणRainपाऊसBeedबीड