शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरण @ ५० टक्के; पाणी पातळीत रात्रीतून १५ टक्यांने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 18:25 IST

गेल्यावर्षी माजलगाव धरण परतीच्या पावसाने पूर्ण क्षमतेने भरले होते.

ठळक मुद्देधरण परिसरात २४ तासात ५० मी.मी. पावसाची नोंद

माजलगाव  : माजलगाव धरण परिसरात मागील २४ तासात ५०  मी.मी.पावसाची नोंद झाली. मंगळवारी पहाटे धरण परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे धरणात चांगल्याच पाण्याची वाढ झाली. चोवीस तासापूर्वी धरणात ३५ टक्के पाणीसाठा होता. तो मंगळवारी दुपारी ५० टक्के झाला होता. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्यावर्षी माजलगाव धरण परतीच्या पावसाने पूर्ण क्षमतेने भरले होते. यामुळे अनेक दिवस धरणातून सिंदफना पात्रात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे  कालवा व नदी द्वारे अनेक वेळा शेतीला व पिण्यासाठी  सोडण्यात आले होते. गेल्या वर्षी धरण भरल्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. माजलगाव धरणात 2 जुन रोजी 427.68 मिटर ऐवढा पाणी साठा होता. यावेळी धरणात 204.50 दलघमी ऐवढा एकुन पाणी साठा होता तर 62.00 दलघमी ऐवढा उपयुक्त पाणी साठा होता व 19.87 टक्के पाणी होते.बेमोसमी पावसानेच दोन टक्के पाणी पातळीत वाढ झाली होती.

मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस; छोटी धरणे भरल्याने दिलासा, नदी-नाल्यांना पूर

सोमवारी सकाळी  धरणात 428.74 मिटर ऐवढा पाणी साठा होता. यावेळी धरणात 254 दलघमी एवढा एकूण पाणीसाठा होता. तर 112 दलघमी ऐवढा उपयुक्त पाणी साठा होता तर 35.90 टक्के पाणी साठा होता. धरण क्षेत्रात सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी पहाटे जोरदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन मंगळवारी दुपारी 12 वाजता धरणाची पाणी पातळी 429.48 मिटर झाली. उपयुक्त साठा 153 दलघमी तर एकुन पाणी साठा 295 दलघमी झाला होता.यामुळे धरणाची टक्केवारी 50 टक्के झाली होती. धरणा 47 हजार क्युसेसने पाण्याची आवक सुरू होती. माजलगाव तालुक्यात 50 मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.

Video : नामी शक्कल !  पुराच्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थ जेसीबीवर स्वार 

टॅग्स :RainपाऊसBeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरण