शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

मुख्याधिकाऱ्यांनी मार्केट बंदचे आदेश काढले व्हाट्सएप अॅप स्टेटसवर; व्यापाऱ्यांची उडाली धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 13:47 IST

शासनाचे नवीन नियम निघाल्याने विकेंड लाँकडाऊन अंतर्गत 17 व 18 एप्रिल रोजी व्यापाऱ्यांनीही बंद केले नाही व प्रशासनाने देखील त्यांना नवे आदेश दिले नव्हते

ठळक मुद्देनगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शुक्रवारी आपल्या स्टेटसवर विकेंड लॉकडाउनचे आदेश दिलेमुख्याधिकारी यांनी व्हाट्सएप अॅप स्टेटसवर आदेश काढल्याने यामुळे व्यापारात संभ्रम निर्माण झाला.

माजलगाव : शहरातील मेडिकल वगळता सर्व व्यापाऱ्यांनी विकेंड लाँकडाऊनचा जिल्हा प्रशासनाकडुन काहीच आदेश नसतांना येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी व्हाट्सएप अॅप स्टेटसवरुन असे आदेश काढल्याने शनिवारी सकाळी एकच गोंधळ उडाला. लेखी आदेश काढण्याऐवजी व्हाट्सएप अॅप स्टेटसवरुन आदेश आल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यात काही व्यापाऱ्यांनी लेखी आदेश दाखवल्याशिवाय बंद करण्यास विरोध दर्शविला.

महाराष्ट्र शासनाने 15 दिवसापूर्वी विकेंड लाँकडाऊनच्या अंतर्गत शनिवार व रविवार रोजी मेडीकल वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे माजलगाव शहरासह संपूर्ण जिल्हा 10 व 11 एप्रिलला बंद होता.त्यानंतर शासनाचे नवीन नियम निघाल्याने विकेंड लाँकडाऊन अंतर्गत 17 व 18 एप्रिल रोजी व्यापाऱ्यांनीही बंद केले नाही व प्रशासनाने देखील त्यांना नवे आदेश दिले नव्हते . परंतु, येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शुक्रवारी आपल्या स्टेटसवर विकेंड लॉकडाउनच्या अंतर्गत मेडिकल वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले. यात आदेशाचे उल्लंघन केल्यास गुन्हा नोंदवून दुकान सिल करून लायसन रद्द करण्यात येतील असेही या स्टेटसमध्ये नमुद केले आहे. मुख्याधिकारी यांनी व्हाट्सएप अॅप स्टेटसवर आदेश काढल्याने यामुळे व्यापारात संभ्रम निर्माण झाला. यात सकाळपासूनच पोलीस दुकान बंद करण्यास सांगत होते. या बंदला काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत  आम्हाला शासनाचे किंवा जिल्हा प्रशासनाचे लेखी आदेश दाखवा म्हणताच पोलीस देखील निरुत्तर झाले.

तालुका प्रशासनाने बंद ठेवण्याबाबत व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. मुख्याधिकारी यांनी लेखी आदेश काढण्याऐवजी व्हाट्सएप अॅप स्टेटसवर आदेश दिल्याने संभ्रम निर्माण झाला. पोलीसांनी अनेकांना जबरदस्तीनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले. आम्ही नेहमी प्रशासनास मदत करण्यास तत्पर आहोत, मात्र अशा पद्धतीने व्हाट्सएप अॅप स्टेटसवर आदेश देऊन बंद पाळण्यास आमचा  विरोध आहे.- संजय सोळंके, अध्यक्ष, किराणा असोसिएशन, माजलगाव

बंदचे आवाहन केले होतेव्यापाऱ्यांनी बंद ठेवून प्रशासनास सहकार्य करावे असे आम्ही सांगितले होते. आम्ही बंदचे आदेश लेखी स्वरूपात दिले नव्हते फक्त आवाहन केले होते. मुख्याधिकारी यांनी व्हाट्सएप अॅप स्टेटसवर आदेश काढले असतील तर ते चुकीचे आहे.- वैशाली पाटील , तहसीलदार, माजलगाव 

टॅग्स :Beedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या