शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य रस्ता वारंवार होतोय जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST

हमरस्त्यावर मोकाट जनावरांची वर्दळ शिरूर कासार : मोकाट शेळ्यांचा उपद्रव कमी झाला असला तरी अजूनही मोकाट जनावरांची हमरस्त्यावरील वर्दळ ...

हमरस्त्यावर मोकाट जनावरांची वर्दळ

शिरूर कासार : मोकाट शेळ्यांचा उपद्रव कमी झाला असला तरी अजूनही मोकाट जनावरांची हमरस्त्यावरील वर्दळ मात्र कमी झालेली नाही. ही जनावरं रस्त्याच्या मधेच आपली बैठक मारतात तर कधी सुसाट धावतात, त्यांची लागलेली टक्करदेखील चालणाऱ्याला इजा करण्याची भीती असते. गांभिर्याने यावर विचार व्हावा, अशी सर्वसामान्य ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

सूर्यफुलाचे तालुक्यात दर्शनच नाही

शिरूर कासार : तालुक्यात पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाचा पेरा जवळपास पन्नास हजार हेक्टरवर केला गेला. त्यात कापूस, सोयाबीन, तूर, बाजरीसह अन्य सर्वच वान दिसत असले तरी सूर्यफुलाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने सूर्यफुलाचे दर्शनसुद्धा होत नाही.

अतिवृष्टीने पिके पडू लागली पिवळी

शिरूर कासार : तालुक्यात पाऊस वेळेवर पडल्याने यावर्षी सोयाबीन पेरा मोठ्या प्रमाणावर झाला असून, मेहनत झाल्यानंतर हिरवेगार दिसत होते; मात्र गेली सहा-सात दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाला पिवळकिची बाधा जडली आहे. पावसाने उघडीप व कडक उन्हाची गरज असल्याचे शेतकरी सांगतात.

सोयाबीन संरक्षक म्हणून एरंडी बिया

शिरूर कासार : यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीन पेरा मोठ्या प्रमाणावर केला गेला. अळी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोयाबीन भोवताली एरंड बिया लावल्यास ते संरक्षक म्हणून चांगले उपयोगी पडणार असल्याचा सल्ला कृषी विभागाकडून केला जात आहे. कपाशीभोवतीसुद्धा एरंडी बिया लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जुन्या घराची डागडुजी

शिरूर कासार : सध्या रोजच पडत असलेल्या पावसामुळे जुनाट घरांना गळती लागत आहे. शिवाय भिंतीची झालेली पडझड दुरुस्ती केली जात आहे. गळती थांबवण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून मेनकापड, ताडपत्री झाकली जाऊन तूर्तास सोय केली जात असल्याचे दिसून येते.

सायंकाळची शतपावली

शिरूर कासार : घरची सगळी आवराआवर झाली आणि जेवण झाल्यानंतर सायंकाळी शतपावलीला पसंती दिली जात असून, जेवढे जमेल तेवढी पायपीट करण्यात महिलांचादेखील सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

बांधकामाचा धडाका, विटांचे भाव दुप्पट

शिरूर कासार : तालुक्यात सध्या बांधकामाचा धडाका सुरू असल्याने भाजलेल्या विटाला मोठी मागणी आहे. परिणामी, विटांचे हजारी भाव दीडपट दुप्पट झाले असल्याचे बांधकाम करणारे व व्यावसायिक बोलत आहे.

दुभाजक सुशोभिकरण करण्याची मागणी

अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यावर असलेल्या दुभाजकाची दुरुस्ती करून त्याला रंग देण्यात यावा, तसेच या दुभाजकांमध्ये येत्या पावसाळ्यात शोभिवंत फुलांची झाडे लावल्यास शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. यासाठी नगरपालिकेने आतापासून नियोजन करावे, अशी मागणी रणजित डांगे यांनी केली आहे.

बाजारपेठेत होतेय नियमांचे उल्लंघन

अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांपासून अंबाजोगाई तालुक्यात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे; मात्र कोरोना कायमस्वरूपी गेला, या भावनेतून नागरिक बाजारपेठेत आता मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. प्रशासनानेही यासंदर्भात ठोस उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी केली आहे.