शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Maharashtra Cabinet expansion : राष्ट्रवादीत खदखद; मंत्रिपद न मिळाल्याने आमदार प्रकाश सोळंके देणार राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:52 IST

आमदार सोळंके राजीनामा देण्यावर ठाम असून त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे ९  सदस्य, पंचायत समितीचे ३ सभापती व बाजार समितीचे सभापती अशोक डक सुद्धा आहेत. 

ठळक मुद्देया बाबत त्यांना फोनद्वारे विचारणा केली असता त्यांनी यास दुजोरा दिला.  पदाधिकारीही देणार राजीनामे?

माजलगाव (जि. बीड) :  एक टर्म वगळता सलग चार वेळा माजलगावचे आमदार राहिलेले प्रकाश सोळंके हे सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात  स्थान न मिळाल्याने मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत राजीनामा देणार आहेत. स्वत: सोळंके यांनीच सोमवारी ही माहिती दिली. दरम्यान, आमदार  सोळंके हे राजीनामा देण्यासाठी पहाटेच पुण्यावरून मुंबईला रवाना झाले आहेत. राजीनामा देण्यावर ते ठाम असून त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे ९  सदस्य, पंचायत समितीचे ३ सभापती व बाजार समितीचे सभापती अशोक डक सुद्धा आहेत. 

२००४  मध्ये माजलगाव मतदारसंघातून निवडून आल्यानंतर सलग १५ वर्षे ते आमदार राहिले. २००९ मध्ये त्यांना  राज्याचे सहकार राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यानंतर अवघ्या साडेतीन वर्षातच सुरेश धस यांच्यामुळे त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदीलाटेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिले व मतदार संघात त्यांनी राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळवून दिले. तसेच सोमवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापती-उपसभापती पदाच्या निवडीत देखील मतदारसंघात राष्ट्रवादीचा वरचष्मा ठेवण्यात त्यांना यश आले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बीड जिल्ह्यात भाजपाचा वारू मिरवत होता तरी, माजलगाव मतदार संघात मात्र त्यांनी भाजपाला रोखून धरलेले होते.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात प्रकाश सोळंके यांचे नाव पक्के असल्याचे बोलले जात होते. सोळंके यांचे पवार काका- पुतण्या दोघांशी असलेले संबंध व त्यांची पक्षावरील निष्ठा आणि पाठीशी असलेला अनुभव पाहता किमान राज्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल अशी अपेक्षा त्यांना होती. कार्यकर्त्यांमध्येही उत्साह वाढला होता. मात्र सोमवारी  झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रकाश सोळंके यांना स्थान न मिळाल्याने मतदार संघात निराशेचे वातावरण पसरले. स्वत: प्रकाश सोळंके हे देखील नाराज झाले. ३१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. या बाबत त्यांना फोनद्वारे विचारणा केली असता त्यांनी यास दुजोरा दिला.  

पदाधिकारीही देणार राजीनामे?प्रकाश सोळंके यांच्याकडे नऊ जिल्हा परिषद सदस्य आणि तीन पंचायत समिती सभापती आहेत. हे सर्वजण मंगळवारी सोळंके यांच्या समर्थनार्थ राजीनामे देणार असल्याचे सांगण्यात आले.  काही दिवसांवर बीड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडी आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय गोटात खळबळ माजली आहे.

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसPrakash Solankeप्रकाश सोळंकेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार