शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कामखेड्यात २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:48 IST

तालुक्यातील कामखेडा येथे टॅँकर मुक्तीसाठी शिवकालीन पाणी साठवण योजना, जीआर अंतर्गत ५ बोअरवेलवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवून २४ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या छतावरील पावसाचे जवळपास २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा उभारुन गावाला स्वनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

ठळक मुद्देलोकार्पण : क्लायमेट रियालिटी व मॅप्स संस्थेचा उपक्रम, ग्रामस्थांचे सहकार्य; रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे गावातील पाणी टंचाईवर होणार मात

बीड : तालुक्यातील कामखेडा येथे टॅँकर मुक्तीसाठी शिवकालीन पाणी साठवण योजना, जीआर अंतर्गत ५ बोअरवेलवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवून २४ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या छतावरील पावसाचे जवळपास २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा उभारुन गावाला स्वनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. उभारलेल्या यंत्रणेचे सोमवारी एका कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.यावेळी आ. लक्ष्मण पवार, क्लायमेट रियालिटी प्रोजेक्ट इंडियाचे अध्यक्ष आदित्य पुंडीर, रेन वॉटर हार्वेस्टिंग तज्ज्ञ निवृत्त कर्नल शशिकांत दळवी, मॅप्स इंडस्ट्रीजचे एम. डी. अनिरुद्ध तोडकर आदी उपस्थित होते.गणेश नेवडे यांनी माहिती देत हा उपक्रम राबविल्याबद्दल निवृत कर्नल शशिकांत दळवी व अनिरु द्ध तोडकर तसेच त्यांचे सहकारी गोरख वाघमारे यांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत केले. हा उपक्रम गावातील सर्व बोअरवेलवर हा राबवल्यानंतर गावाची पाण्याच समस्या कायमची दूर होऊ शकते, त्यासाठी आ. पवार यांच्याकडे निधीची मागणी त्यांनी केली.आ. लक्ष्मण पवार यांनी गावातील टॅँकरच्या फेºयांमध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले. तसेच उर्वरित कामासाठी निधी देण्याच्या मागणीवर विचार करू असे सांगितले. कामखेडा येथे राज्यातील पहिला उपक्रम सुरु केला. कामखेडा व गेवराई तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. निवृत्त कर्नल शशिकांत दळवी व अनिरुद्ध तोडकर यांनी या भागातील पाण्याचे संकट कायमचे दूर करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाउल उचलल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. हा उपक्र म इतर गावांमध्ये सुरु करण्यावर आ. पवार यांनी जोर दिला. सततच्या पाणी संकटावर मात करण्यासाठी असा उपक्रम राबविलेले बीड जिल्ह्यातील कामखेडा हे राज्यातील पहिले गाव असल्याचे सांगून निवृत्त कर्नल दळवी यांनी या उपयुक्त पध्दतीची माहिती दिली.कामखेडा होणार टॅँकरमुक्तकामखेडा येथे जवळपास ६५० इमारती आहेत, ज्यांच्या ५.२६ लाख चौरस फूट छतावरुन जवळपास ३.१५ कोटी लिटर पावसाचे पाणी भूगर्भात सोडून, भूगर्भातील पाण्याची पातळी अशा उपक्रमातून वाढविता येईल तसेच गाव कायमचे टॅँकरमुक्त हाईल, असे कर्नल दळवी म्हणाले.

टॅग्स :Beedबीडwater scarcityपाणी टंचाई