शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम एकीशी अन् संसार भलतीशी; बीड जिल्ह्यात दोन युवतींवर अत्याचाराच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 13:04 IST

बीड, गेवराई तालुक्यांतील या घटना असून पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे

बीड/गेवराई : ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अन् प्रेमातून लग्नाच्या आणाभाका खाल्ल्या; पण प्रियकराने प्रेयसीला अंधारात ठेवून भलतीशीच संसार थाटला. जिल्ह्यात २४ तासांत अशी दोन प्रकरणे उजेडात आली. याप्रकरणी गेवराई व बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

गेवराई तालुक्यातील १७ वर्षीय पीडित मुलीची ज्ञानेश्वर रमेश घुगे ( २५, रा. कवडगाव, ता. गेवराई) याच्याशी ओळख झाली. पाच वर्षांपासून दोघांचे प्रेम प्रकरण होेते. लग्नाचे आमिष दाखवून ज्ञानेश्वर घुगेने तिच्यावर गेवराई, टीव्ही सेंटर, औरंगाबाद, नेवासा (जि. अहमदनगर) या ठिकाणी वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर भलत्याच मुलीशी लग्न उरकले. पीडिता दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे कळाल्यावर ज्ञानेश्वर घुगेने तिला गोळ्या खायला लावून गर्भपात केला. पीडितेच्या फिर्यादीवरून ११ जानेवारी रोजी गेवराई पोलीस ठाण्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक अर्चना भोसले यांनी आरोपीस अटक केली. त्यास १२ रोजी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तीन वर्षांपासून अत्याचार१८ वर्षांच्या युवतीवर तीन वर्षांपासून तरुणाने अत्याचार केला. लग्नाचे आमिष दाखवून त्याने कुकर्म केले. मात्र, नंतर दुसऱ्याच मुलीशी विवाह केला. ही घटना १२ जानेवारी रोजी बीड ग्रामीण ठाणे हद्दीतील एका गावात उघडकीस आली. याप्रकरणी विशाल किसन भंडारे (२७, रा. नवगण राजुरी, ता. बीड) याच्यावर बलात्कार, बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला. दरम्यान, विशाल भंडारेला जेरबंद केले असल्याची माहिती पो.नि. संतोष साबळे यांनी दिली. तपास उपनिरीक्षक मीना तुपे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड