शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

बंकटस्वामींच्या पुण्यतिथीला लोटला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:05 IST

वारकरी संप्रदायातिल भक्ती सूर्य महान संत वै बंकटस्वामी महाराज यांच्या अमृत महोत्सवी पुण्यतिथी कार्यक्रमाची रविवारी दुपारी काल्याच्या कीर्तनाने थाटात सांगता झाली.

ठळक मुद्देकाल्याच्या कीर्तनाने सांगता : वारकरी शिक्षण संस्थेच्या उभारणीत बंकटस्वामी महाराजांचे विशेष योगदान - संदीपान हसेगावकर

नेकनूर : वारकरी संप्रदायातिल भक्ती सूर्य महान संत वै बंकटस्वामी महाराज यांच्या अमृत महोत्सवी पुण्यतिथी कार्यक्रमाची रविवारी दुपारी काल्याच्या कीर्तनाने थाटात सांगता झाली. सकाळी समाधी अभिषेक करण्यात आला तर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ज्ञानसिंधू संदीपान महाराज शिंदे हसेगावकर यांचे काल्याचे कीर्तन झाले.यावेळी प्रमुख संत मंडळी संस्थानचे महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, महंत महादेव महाराज चाकरवाडीकर, हरिहर भारती महाराज, विनायक महाराज काचगुंडे, ज्ञानेश्वर माऊली मंझरीकर, रामहरी महाराज डंबरे, नवनाथ महाराज जरुड, वैजीनाथ महाराज नांदूर, मारुती महाराज चोरमले, भागवत महाराज पानसरे, परशुराम महाराज मराडे यांचा समावेश आहे.राजकीय उपस्थितीत आ. जयदत्त क्षीरसागर, आ. संगीता ठोंबरे, रमेश पोकळे, काँग्रेस प्रवक्ते रवींद्र दळवी, अक्षय मुंदडा, रवींद्र क्षीरसागर, अंजली घाडगे, संतोष हांगे, अशोक लोढा, अरुण डाके, दिलीप गोरे, भारत काळे यांच्यासह बंकटस्वामी संस्थानचे सर्व विश्वस्त उत्सव कमेटी व हजारो भाविकांची उपस्थिती होती.यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. सात दिवस महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकराची कीर्तने झाली. काल्याचे कीर्तन संदीपान महाराज यांचे झाले. ‘अवघेची गोड झाले। मागीली ये भरी आले ॥ साह्य झाला पांडुरंग। दिला अभ्यतरी संग॥ थंडीये पहाता तो वाव । मागे पाहतावो ठाव ॥ तुका म्हणे दिली। स्वप्नी चे जागे झाले ।’ या तुकाराम महाराज यांच्या अभंगांवर चिंतन मांडले. यावेळी श्री गुरु बंकटस्वामी महाराज यांच्या चरित्रातील काही आठवणी सांगितल्या. वारकरी शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये बंकटस्वामी महाराज यांच्या विशेष योगदान असल्याचा उल्लेख केला. तसेच स्वामी महाराज हे मोठे अभ्यासक होते. पायी चालताना ज्ञानेश्वरी सांगत होते. त्यांचे वारकरी संप्रदायावर खूप मोठे उपकार आहेत. ग्रामीण भागात खूप मोठे काम स्वामींनी केले. कीर्तनात अभंग निरूपण पध्दत विकसित केली. त्या स्वामींचे खूप मोठे आशीर्वाद आहेत, असेही महाराजांनी सांगितले.सर्व मान्यवरांचे आभार संस्थानतर्फे मानण्यात आले . श्री गुरु बंकट स्वामी महराज यांची फडावरील सर्व गुणवान पैकी नाना महाराज कदम, सत्यवान महाराज लाटे , सुरेश महाराज जाधव, अभिमान महराज, अच्युत महाराज घोडके, ओंकार महाराज, मंगेश महाराज, रामेश्वर महाराज दराडे रंजित महाराज शिंदे, अंकुश महाराज, अनिल महराज, मंगेश महाराज, दिनेश महाराज, जनार्दन महराज बांगर, अर्जुन महाराज, वसंत महाराज आदी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने भाविक व टाळकरी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम