शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी पाळत ठेवून साधली संधी; दिवसाढवळ्या बँकेसमोरून सव्वा लाखांच्या रकमेची बॅग लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 00:00 IST

अंबाजोगाईत कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा

अंबाजोगाई - शहरातील एका व्यापाऱ्याचे दहा लाखांचे दागिने लुटल्याची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना उघड आव्हान देत दिवसाढवळ्या एका बँकेसमोरून १ लाख ३३ हजारांची रक्कम असलेली बॅग लंपास केली. ही घटना मंगळवारी (दि.१६) दुपारी बँक ऑफ इंडिया समोर घडली.

अंबाजोगाई तालुक्यातील अंजनपूर येथील विजयकुमार तुळशीराम इस्ताळकर हे धानोरा येथील मतीमंद विद्यालयात निदेशक आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार,ते वडिलांसोबत दुचाकीवरून (एमएच ४४ इ ९४६२) मोंढ्यातील महाराष्ट्र बँकेत गेले. तिथून त्यांनी पगाराच्या खात्यातून १ लाख ३३ हजार रुपये काढले. ती रक्कम एका कापडी पिशवीत ठेवून ती पिशवी हँडलला अडकवली आणि जयवंती नगर मधील बँक ऑफ इंडियात जमा करण्यासाठी आले. बँकेसमोर गाडी लॉक करत असताना पाळत ठेवून असलेल्या दुचाकीवरील दोघा चोरट्यांनी ती पिशवी लंपास करून पोबारा केला. ही बाब लक्षात आल्याने इस्ताळकर पितापुत्रांनी त्या चोरट्यांचा एसआरटी महाविद्यालयापर्यंत पाठलाग केला परंतु ते हाताला लागले नाहीत. सदर फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पो.कॉ. नरहरी नागरगोजे करत आहेत. 

चोरटे जोमात, नागरिकात दहशतअंबाजोगाई शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून चोरीच्या घटना नित्याच्या झाल्या आहे. वाहनचोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, बॅग चोरी यापैंकी एखादी घटना नसेल असा एकही दिवस जात नाही. आयुष्यभराच्या कमाईची क्षणात लूट होत असल्याने व्यापारी, नोकरदार, सामान्य नागरिक हवालदिल आहेत. त्यातच यापूर्वीच्या अनेक चोऱ्यांचे तपासही अद्याप पूर्णत्वाला जाऊ शकलेले नाहीत. तसेच, शहरातील अवैध धंदे आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्था पाहता पोलिसांचा धाक संपला कि काय अशी शंका येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर बिघडलेली परिस्थिती सावरणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड