शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केबीसीचा हुबेहूब स्टुडिओ, व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेऊन बनवले सावज, शिक्षकाचे गेले २९ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 13:37 IST

बीड सायबरने केली साखळी ब्रेक : म्होरक्याला पकडण्याचे आव्हान कायम

बीड : केबीसीच्या नावाखाली गंडविणाऱ्या टोळीने हुबेहूब स्टुडिओ बनवून व्हिडिओ तयार केला, त्याआधारे व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घेऊन सावज बनविले जात असे. या भामट्यांच्या गळाला लागून २९ लाख रुपये गमावणाऱ्या शिक्षकाला अशा पद्धतीनेच फसविल्याचे समोर आले आहे. देशभर धुमाकूळ घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांची एकेक कडी शोधून साखळी ब्रेक करण्यात बीडच्या सायबर सेलला यश आले. त्यांच्या म्होरक्याला पकडण्याचे आव्हान अद्याप कायम आहे.

केबीसीची २५ लाखांची लॉटरी व महागड्या कारचे आमिष दाखवून येथील एका शिक्षकास २९ लाखांना गंडविले होते. यापूर्वी पाच जणांना अटक केली होती, या साखळीतील नेहाल जमाल अख्तर (२२, रा. जवकटीया, जि. चंपारन) व जुबेर अब्दुल हकीम (२५, रा. लालसराजा, जि. चंपारन) या दोघांना बीडच्या सायबर सेलने २४ व २५ ऑगस्ट रोजी बिहारमध्ये बेड्या ठोकल्या.

सायबरचे पो. नि. रवींद्र गायकवाड, हवालदार भारत जायभाये, पो. ना. आसेफ शेख, अन्वर शेख, विजय घोडके यांचे पथक मोठ्या शिताफीने तपासाची कडी जुळवत त्यांच्यापर्यंत पोहोचले. देशभर या टोळीने धुमाकूळ घातला होता. दरम्यान, ऑनलाइन फ्रॉडची रक्कम अमेरिका, सौदी अरेबिया, दुबई व पाकिस्तानला जात असल्याचे निष्पन्न झाले असून, १२ कोटी रुपयांच्या व्यवहारांचे पुरावे हाती लागले आहेत. त्यामुळे सायबर सेलचे हे मोठे यश मानले जात आहे.

केबीसीच्या नावाखाली ऑनलाइन फ्रॉडची रक्कम वेगवेगळ्या खात्यांतून फ्लो केली जात होती, त्याची कडी शोधण्याचे काम आव्हानात्मक होते. ही साखळी ब्रेक करण्याचे काम केल्याने सायबरच्या कामगिरीची वरिष्ठांनी दखल घेतली आहे. याबद्दल मी २५ हजारांचे रिवॉर्ड तपास पथकाला जाहीर केले आहे. यातील मास्टर माइंडचाही शोध सुरू आहे.- नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड.

तपास यंत्रणांनी घेतली दखलया प्रकरणातील फ्रॉडची रक्कम पाकिस्तानसह परदेशात गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बीड सायबरने पकडलेले आरोपी विदेशातील लोकांच्या संपर्कात कसे, यादृष्टीने तपास यंत्रणा देखील चौकशी करत आहे. एटीएस, एनआयएला बीड पोलिसांनी यासंदर्भातील गोपनीय अहवाल १ सप्टेंबर रोजी पाठविला. यास पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पुष्टी दिली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमBeedबीड