शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

Lok Sabha Election 2019 : प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीवरील आक्षेप फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 19:31 IST

दाखल केलेले  ६ आक्षेप जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी फेटाळले. 

बीड : भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी दाखल केलेले  ६ आक्षेप जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी फेटाळले. 

आक्षेप काय?1. प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी मुंबई दक्षिण वरळी आणि बीड या दोन लोकसभा मतदारसंघात नाव नोंदविलेले आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ प्रमाणे गंभीर गुन्हा आहे. 2.बीडचे माजी खा. कै. गोपीनाथराव मुंडे यांचे नाव स्वत:च्या नावापुढे वापरुन प्रीतम मुंडे या जाणीवपूर्वक जिल्ह्यातील मतदारांना भावनिक करुन राजकीय फायदा उचलत आहेत.  3.प्रीतम मुंडे या लोकभावनेशी खेळत असून विशिष्ट व्यक्तीच्या नावाचा फायदा घेऊन मतांमध्ये रुपांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 4. प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांनी २०१४ मध्ये पोटनिवडणुकीत दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाच्या शपथपत्रामध्ये निवासी इमारतीच्या माहितीमध्ये नं. १२०२ , पूर्णा- वरळी, सागर सोसायटी, सर पोचखानवाला रोड, मुंबई येथील मालमत्तेची माहिती दडविण्यात आली. 

5.प्रीतम मुंडे या बॅँकेच्या संचालक आहेत. वैद्यनाथ बॅँकेच्या संचालकांवर बोगस कर्जवाटप अपहारप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून न्यायालयाने अद्यापपर्यंत दोषमुक्त केलेले नाही. वैद्यनाथ बॅँकेशी संबंधित इतर प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. त्यासंदर्भातील माहिती जाणीवपूर्वक शपथपत्रात नमूद केलेली नसल्याने प्रीतम मुंडे यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करावा. 6.प्रीतम मुंडे यांचा प्रीतम गौरव खाडे या नावाने काढलेला डीन नंबर ३१ आॅक्टोबर २०२२ पर्यंत रद्द केल्याची माहिती शपथपत्रात नाही. 

स्पष्टीकरण : अर्जदाराने कधीही दोन मतदारसंघात मतदान केले नाही. अशी नावनोंदणी उमेदवाराने स्वत: केलेली नाही. कंपनी कायद्याबद्दलचा आक्षेप निराधार आहे.  प्रीतम यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल अथवा प्रलंबित नाही. उमेदवाराच्या दोन नावांबद्दल (विवाहापूर्वीचे आणि नंतरचे) शपथपत्र जोडले आहे. वैद्यनाथ बॅँकेच्या संदर्भात कोठेही गुन्हा दाखल नसल्याचे सांगत मुंडे यांचे प्रतिनिधी संतोष हांगे यांनी बाजू मांडली. 

टॅग्स :Pritam Mundeप्रीतम मुंडेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBeedबीड