शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Lok Sabha Election 2019 : बीडमध्ये मागील दोन निवडणुकीत पहिल्या दोन उमेदवारांना लाखभर मतांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 15:23 IST

२००९ आणि २०१४ निवडणुकांमध्ये पहिल्या दोन उमेदवारांस जवळपास एक लाख मतांचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देनोंदणीकृत पक्षाच्या ८ उमेदवारांनी ५१ हजार ४१३ मते घेतली ११ अपक्ष उमेदवारांनी ५५ हजार ६०३ मते घेतली.

- सतीश जोशी, बीड

बीड लोकसभा मतदारसंघांच्या २००९ आणि  २०१४ निवडणुकांचा तुलनात्मक अभ्यास केला, तर प्रमुख पहिल्या दोन उमेदवारांस उर्वरित उमेदवारांकडून जवळपास एक लाख मतांचा फटका बसला आहे. उर्वरित उमेदवारांनी २००९ मध्ये १० टक्के, तर २०१४ मध्ये ८ टक्के मते घेतली होती.

२००९ मध्ये भाजपचे गोपीनाथराव मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश आडसकर यांच्यात लढत झाली. १० लाख ७४ हजार ५२ मतांपैकी मुंडे  यांना ५ लाख ५३ हजार ०४२ (५१.६१ टक्के) तर आडसकर यांना ४ लाख १३ हजार ४२ (३८.५ टक्के) मते मिळाली होती. मुंडे हे १ लाख ४० हजार ९५२ मतांनी विजयी झाले होते. या दोघांची घेतलेल्या मतांची टक्के ९०.१ टक्के येते. उर्वरित १९ उमेदवारांनी मिळून १० टक्के मते म्हणजे १ लाख ७ हजार १६ मते खाल्ली होती. १९ जणांमध्ये ८ उमेदवार नोंदणीकृत पक्षाचे, तर ११ उमेदवार अपक्ष होते. नोंदणीकृत पक्षाच्या ८ उमेदवारांनी ५१ हजार ४१३ मते तर ११ अपक्ष उमेदवारांनी ५५ हजार ६०३ मते घेतली.

१,३६,४५४ मतांनी विजयी २०१४ मध्ये भाजपचे गोपीनाथराव मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश धस यांच्यात लढत झाली. १२ लाख ३२ हजार २०२ मतांपैकी मुंडे  यांना ६ लाख ३५ हजार ९९५ (५१.६१ टक्के) तर धस यांना ४ लाख ९९ हजार ५४१ (४०.५ टक्के) मते मिळाली होती. मुंडे हे १ लाख ३६ हजार ४५४ मतांनी विजयी झाले होते. या दोघांची घेतलेल्या मतांची टक्के ९२.१ टक्के येते. ३७ उमेदवारांना ८ टक्के मते : याचाच अर्थ ३९ पैकी उर्वरित ३७ उमेदवारांनी मिळून ८ टक्के मते म्हणजे ९९ हजार ६६६ मते खाल्ली होती. ३७ जणांमध्ये ११ उमेदवार नोंदणीकृत पक्षाचे, तर २६ उमेदवार अपक्ष होते. या दोन्हीही निवडणुकांमध्ये उर्वरित उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा फटका हा प्रमुख उमेदवारांना बसला आहे. 70,000 मते अपक्षांना नोंदणीकृत पक्षाच्या ११ उमेदवारांनी २६ हजार ३४० मते तर २६ अपक्ष उमेदवारांनी ७० हजार ३२६ मते घेतली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानbeed-pcबीडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019