शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरण : बीडमध्ये पाच जणांना अटक व सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 16:59 IST

 शुक्रवारी आणखी दोघांना अटक केली. उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. 

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्याला भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या प्रकरणात पाच जणांना गुरुवारी मध्यरात्री अटक करुन जामिनावर सुटका करण्यात आली.  शुक्रवारी आणखी दोघांना अटक केली. उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. 

२७ मार्च रोजी भाजपच्या बीड लोकसभा उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेस पदाधिकारी दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप नोंदवला होता. सुनावणीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले. याच दरम्यान भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेराव करुन त्यांना मारहाण केली होती. 

याप्रकरणी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलधरसह संतोष राख, बंटी फड व अनोळखी २० ते २५ जणांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या आरोपींच्या शोधात स्थानिक गुन्हे शाखा, शिवाजीनगर पोलीस व विशेष पथके रवाना केली. गुरुवारी मध्यरात्री औरंगाबाद येथून गलधरसह संग्राम बांगर, अमोल परळकर, मोहम्मद अझरोद्दीन मोहम्मद सलीम, शेख इरशाद शेख रज्जाक या पाच जणांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांकडे स्वाधीन केले. या सर्वांची चौकशी करुन त्यांची जामिनावर सुटका केली. शुक्रवारी सायंकाळी सुनिल दत्तात्रय मिसाळ व संदीप शेषराव उबाळे यांना बीड शहरात अटक केल्याचे शिवाजीनगर ठाण्याचे पो. नि. शिवलाल पुर्भे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

दुसऱ्या गुन्ह्यात दोघे ताब्यात; एकाला जामीनयाच दिवशी भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की झाली होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जमावबंदी असताना गोंधळ घातल्याप्रकरणी स्वप्नील गलधर, बाबरी मुंडे सह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. च्यामध्ये संग्राम बांगर व मोहम्मद अझरोद्दीन मोहम्मद सलीम या दोघांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये थेट सहभाग दिसत नाही. त्यामुळे चौकशी करुन इतर आरोपींना अटक केली जाईल, असे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी सांगितले. या गुन्ह्यातील संशयित बाबरी राजाभाऊ मुंडे यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकCrime Newsगुन्हेगारीbeed-pcबीड