शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

Lockdown : लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी जनता घरात, पोलीस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:19 IST

बीड, माजलगाव, आष्टी, केज, परळी, अंबाजोगाईत कडकडीत बंद

ठळक मुद्देदिवसभर रस्ते निर्मनुष्य होते.अंमलबजावणीसाठी प्रशासन रस्त्यावर

बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाय योजनेंतर्गत १२ ते २१ आॅगस्टदरम्यान जिल्ह्यातील प्रमुख सहा शहरांमध्ये लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार बीड, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, आष्टी आणि केजमध्ये बुधवारी पहिल्या दिवशी नागरिक घरात आणि पोलीस रस्त्यावर असे चित्र पहायला मिळाले. 

मंगळवारी रात्री ११ वाजेपासून पोलिसांनी ध्वनीक्षेपकाद्वारे संचारबंदीबाबत नागरिकांना कल्पना दिली. रात्रभर पेट्रोलिंग सुरु होती. सकाळी ७ ते ९ यावेळेत दूध विक्रेत्यांना घरपोच दूध वितरणासाठी सवलत दिली होती. तर रुग्णालयांशी संलग्न औषधी दुकाने सुरु ठेवण्यास मुभा होती. शहरातील शिवाजी चौक, बार्शी नाका, जालना रोड, नगर रोड, पेठ भागात येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांची तसेच नागरिकांची पोलीस चौकशी करीत होते. दिवसभर रस्ते निर्मनुष्य होते. परळी शहरात  बुधवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी सर्व बाजारपेठ कडककडीत बंद होता. शहरात वाहनांची  वाहतूकही नव्हती, विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी आळा घातला. शहर व संभाजीनगर पोलिसानी गस्त घालून कडक बंदोबस्त ठेवला.

आष्टीकरांचाही प्रतिसादआष्टी : प्रशासनाच्या आदेश आणि आवाहनाला साथ देत शहरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ५ पोलिस अधिकारी, ५० पोलिस,२० होमगार्ड तैनात केले होते. नेहमी गजबजणाऱ्या चौकात शकुशुकाट होता तर बाजारपेठ बंद होती. नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे. विनाकारण फिरताना दिसल्यास कारवाई केली जाईल. नागरिकांनी १० दिवस घराच्या बाहेर न पडता प्रशासनास सहकार्य केले तरच कोरोनाला आष्टीतून हद्दपार करु  शकतो, असे आवाहन पो. नि. बाळासाहेब बडे यांनी केले. 

माजलगाव दंगल नियंत्रण पथक तैनात माजलगाव : शहरात बुधवारी सकाळ पासूनच प्रमुख रस्त्यांवर दंगल नियंत्रण पथकाचे जवान तैनात केल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. शिवाजी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,मौलाना आझाद चौक,संभाजी चौकात पोलीस तैनात होते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची व वाहनांची कसून चौकशी करत होते. कारण नसताना फिरणाऱ्यांना लाठ्यांचा प्रसाद मिळत असल्याने नागरिकही रस्त्यावर येण्याचे टाळत होते. नागरिकांनी नियम पाळून कोरोनाची वाढत चालली साखळी तोडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षण सुरेश बुधवंत यांनी केले. 

परळीत सीसीसीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणीपरळी शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर       मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या  कोविड सेंटरला बुधवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भेट दिली व पहाणी केली. यावेळी  परळीचे तहसीलदार विपीन पाटील, गटविकास अधिकारी संजय केंद्रे, नायब तहसीलदार बाबूराव रुपनर, परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे, वैद्यकीय अधिकारी डॉ दिनेश कुरमे, कोवीड केअर सेंटरचे प्रमुख डॉ अर्शद शेख, पोनि.बाळासाहेब पवार, पोनि हेमंत कदम, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे आदींची उपस्थिती होती.

अंबाजोगाईत अंमलबजावणीसाठी महसूल प्रशासन रस्त्यावरअंबाजोगाई शहर आणि लगतचे जोगाईवाडी, शेपवाडी, चनई आणि मोरेवाडी या गावांमध्येही लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी तालुका महसूल प्रशासनाने कंबर कसली असून सर्व दहा दिवस प्रशासन रस्त्यावर उतरणार आहे.लॉकडाऊन आदेशाचे कडक पालन व्हावे यासाठी शहरातील प्रत्येक चौकात आणि रस्त्यावर खडा पहारा ठेवण्यासाठी महसूलच्या अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी १७ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक पथक प्रमुख आणि दोन सहायक असणार आहेत. ही पथके दहा दिवस शहरातील १७ चौकात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाळत ठेवणार आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड