शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतातून परतताना वीज कोसळली; पित्याच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 14:06 IST

बीड जिल्ह्यात पावसाचा हा तिसरा बळी आहे.

ठळक मुद्दे डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू पाहण्याची वेळ वडिलांवर आली.

जातेगाव (जि. बीड) : शेतातून घरी परतताना वीज कोसळल्याने पित्याच्या डोळ्यादेखत शेतकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास गेवराई तालुक्यातील जातेगाव शिवारात घडली. बीड जिल्ह्यात पावसाचा हा तिसरा बळी आहे. रवी अर्जुन पवार (२६), असे मृताचे नाव आहे. 

 सोमवारी रवी आणि त्याचे वडील दोघे शेतात कापूस लागवड करत होते. दरम्यान, विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. अचानक कोसळलेल्या विजेचा रवीच्या डाव्या मांडीला स्पर्श होताच तो गंभीररीत्या भाजल्याने मरण पावला. परिसरातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेत मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने उत्तरीय तपासणी मंगळवारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रवी पुढे आणि मागे त्याचे वडील अर्जून हे चालत होते. दोघात अंतरही होते. वीज पडताच रवी जागीच कोसळला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू पाहण्याची वेळ वडिलांवर आली. घटनेनंतर अर्जुन पवार व कुटुंबियांना ग्रामस्थांनी  धीर दिला. 

बीड जिल्ह्यातील काही भागांत हजेरीसोमवारी दुपारी साडेचार वाजेनंतर जिल्ह्यात गेवराईसह तालुक्यातील जातेगाव, गढी, पाडळसिंगी भागात चांगला पाऊस झाला. माजलगावात काही वेळ जोरदार पावसाने शेतकरी सुखावले.  आष्टी शहरासह परिसरात एक तास पाऊस झाला.  परळी शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. अंबाजोगाईसह लोखंडी सावरगाव आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, रविवार ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत मागील २४ तासांत

जिल्ह्यात सहा तालुक्यात किरकोळ पाऊस झाला.

सोमवारी दुपारी साडेचार वाजेनंतर जिल्ह्यात गेवराईसह तालुक्यातील जातेगाव, गढी, पाडळसिंगी भागात चांगला पाऊस झाला. माजलगावात काही वेळ जोरदार पावसाने शेतकरी सुखावले.  आष्टी शहरासह परिसरात एक तास पाऊस झाला.  परळी शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. अंबाजोगाईसह लोखंडी सावरगाव आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, रविवार ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत मागील २४ तासांत जिल्ह्यात सहा तालुक्यात किरकोळ पाऊस झाला. 

 

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूagricultureशेती