शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार रुपयांच्या वादातून खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:32 IST

कुकरी, गुप्तीसारख्या हत्याराने वार करुन खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून आरोपी गणेश लक्ष्मण पुरी रा. कासारी ता. आष्टी, जि. बीड यास जन्मठेपेची शिक्षा येथील दुसरे जिल्हा व सत्र न्या.यु. टी. पोळ यांच्या न्यायालयाने सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कुकरी, गुप्तीसारख्या हत्याराने वार करुन खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून आरोपी गणेश लक्ष्मण पुरी रा. कासारी ता. आष्टी, जि. बीड यास जन्मठेपेची शिक्षा येथील दुसरे जिल्हा व सत्र न्या.यु. टी. पोळ यांच्या न्यायालयाने सुनावली.बुवासाहेब रामभाऊ बन यांचे जावाई शिवाजी गिरी यांनी गणेश पुरी याच्याकडून ५७ हजार रुपयात एक गाय विकत घेतली होती. त्यापैकी ५५ हजार रुपये दिले होते व २ हजार रुपये देणे बाकी होते. ८ मे २०१८ रोजी गणेश पुरी हा वस्तीवर गेला. तेथे शिवाजी यांच्या पत्नीला शिवीगाळ केली तसेच शिवाजीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. नंतर ९ मे रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास गणेश पुन्हा शिवाजीच्या वस्तीवर आला. तेंव्हा गायीची उर्वरित बाकी २ हजार रुपये शिवाजी याने सालगड्यादेखत दिली होती. तर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गणेश पुरी हा पत्नीसोबत वस्तीवर जाताना शिवाजीच्या पत्नीने पाहिले होते. तिला संशय आल्याने ती त्यांच्या पाठिमागे गेली. त्याचवेळी गणेश पुरी याने शिवाजीवर हत्याराने वार केल्याचे तिने पाहिले. यावेळी गणेशला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला ढकलून तो दुचाकीवरुन निघून गेला. तर गणेशच्या पत्नीने तेथून पळ काढला. या प्रकरणी बुवासाहेब बन यांच्या फिर्यादीवरुन गणेश पुरी व त्याची पत्नी सुलभा पुरी यांच्याविरुद्ध संगनमताने खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. अंभोरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. ए. सय्यद यांनी तपास करुन आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग केले होते. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांनी काम पाहिले. त्यांना फिर्यादीतर्फे अ‍ॅड. प्रवीण राख, पैरवी अधिकारी पोहेकॉ. शिवाजी डोंगरे यांनी मदत केली.

टॅग्स :Life Imprisonmentजन्मठेपMurderखून