शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यपदार्थांमध्ये गुंगीचे औषध मिसळून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:54 IST

२०१२ च्या उन्हाळ्यापासून ते २०१६ च्या दिवाळीपूर्वी वेळोवेळी गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले.

ठळक मुद्देजिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल गुंगीचे द्रव देऊन केला अत्याचार

बीड :  खाद्यपदार्थांमध्ये गुंगीचे औषध मिसळून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी भगवान ऊर्फ बाळू अप्पासाहेब दळवे (४०, रा. जयगाव) यास जन्मठेप आणि ६० हजार रूपये दंडाची शिक्षा अंबाजोगाई येथील जिल्हा  सत्र न्यायालयाने सोमवारी सुनावली. 

एका  कुटुंबातील दहा वर्षीय मुलगी सुटीनिमित्त जयगाव (ता. परळी) येथे आली होती. तिच्या पोटात दुखत असल्याने २६ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ती आजीसोबत अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात गेली होती. २०१२ च्या उन्हाळ्यापासून ते २०१६ च्या दिवाळीपूर्वी वेळोवेळी गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले. डॉ. अश्विनी अमृतवार आणि डॉ. स्वाती अग्रवाल यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती.

सुरुवातीस तक्रार देण्यास पीडितेच्या कुटुंबीयांनी नकार दिला होता. परंतु पोलिसांनी पीडिता आणि तिच्या माता-पित्याला धीर देत त्यांची समजूत घातली. त्यानंतर सदर मुलीच्या फिर्यादीवरून भगवान दळवे विरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणाचा प्राथमिक तपास उपनिरीक्षक एम. एस. जाधव यांनी केला. नंतर हा तपास अंबाजोगाई उपविभागाचे तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी अंबाजोगाई सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकूण जिल्हा न्या. ३ तथा अपर सत्र न्या. माहेश्वरी पटवारी यांनी आरोपी भगववान दळवे यास जन्मठेप आणि २० हजार रूपये दंड, दहा वर्षे सश्रम कारावास व २० हजार रूपये दंड, तसेच धमकीप्रकरणी सात वर्षे सश्रम कारावास व २० हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला पोक्सो अंतर्गत दोषी धरण्यात आले. या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू अ‍ॅड. एल. बी. फड यांनी मांडली. 

टॅग्स :Rapeबलात्कारLife Imprisonmentजन्मठेपBeedबीड