शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

नेतृत्वाने गावाला मिळाली दिशा

By admin | Updated: October 22, 2015 21:06 IST

आष्टी तालुक्यातील शेवटच्या टोकाचे व मराठवाड्याचे प्रवेशद्वार आणि मेहकरी नदीच्या काठावर वसलेल्या वाघळूज गावाची प्रचिती तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आहे

 

बीड- आष्टी तालुक्यातील शेवटच्या टोकाचे व मराठवाड्याचे प्रवेशद्वार आणि मेहकरी नदीच्या काठावर वसलेल्या वाघळूज गावाची प्रचिती तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आहे. गाव काठावर असले तरी सर्वतोपरी विकास कामे होत आहेत. ब्रिटिशाच्या काळात या ठिकाणावरून जकात नाका घेतला जात होता. येथूनच सगळा कारभार हाकला जायचा. त्यामुळे गावची विशेषओळख बनली आहे. मराठवाड्याच्या शेवटच्या टोकाला असणार्‍या या गावाने जवळच लागून असणार्‍या लमाण तांड्यावरील प्रत्येक घरातील एक युवक हा पोलीस असून, प्रशासकीय नौकरीतही तरूणांनी आपला ठसा उमटवला आहे. स्व. बाजीराव राठोड हे ही याच गावचे डीवायएसपी होते. एकंदरीत गावाने सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवला. माजी महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली सभापती पती संतोषगुंड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पॅनलने ग्रा. पं. वर निर्विवाद वर्चस्व पटकावले आहे. निवडीनंतरच विकास कामे जोमात सुरू आहेत. सात सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये गावच्या एकोप्याने विकास कामात सातत्य राहिले आहे. या माध्यमातून आदर्श गावाकडे वाटचाल सुरू आहे. गावात तलाठी सज्जा कार्यालयाचे काम पूर्ण झाले असून, दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ते झाले आहेत. परिसरात बंधारे बांधण्याची कामे झाली असल्याने जलसिंचनास मदत होत आहे. महादेव मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाणीटंचाई भासू नये म्हणून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. निसर्गाच्या अवकृपेने यंदा टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. दरवर्षी कामानिमित्त अनेक मजुरांचे गावातून स्थलांतर होते. गावातच रोजगार उपलब्ध करून स्थलांतर रोखण्याचा ग्रा. पं. चा प्रयत्न आहे. कायमस्वरूपी पाणीपुरवठा राबवणार असल्याचा मानस पॅनलप्रमुख संतोषगुंडयांनी व्यक्त केला. विकास कामात ग्रामसेवक झगडे मॅडम यांचाही हातभार असतो. ग्रा. पं. च्या निवडणुकीत ग्रामस्थांनी टाकलेला विश्‍वास अद्यापपर्यंत सार्थ ठरविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. विविध योजना राबविण्यासाठी माजी मंत्री सुरेश धस व संतोष गुंड यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आहे. स्थलांतर रोखण्यासाठी व युवकांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पाणीप्रश्न कायमचा मिटविण्यासाठी पाणी योजना राबविण्यात येणार आहे. उर्वरित काळात देखील ग्रामस्थांना विश्‍वासात व सदस्यांच्या मदतीने विकास साधला जाणार आहे. - विश्‍वनाथ भिवाजी क्षेत्रे, सरपंच गावात नव्याने तलाठी सज्जाच्या इमारतीचे काम झाले आहे. बीडपासून  गावाचे अंतर किलोमीटर ■ संत कैकाडी महाराज व महादेव महाराज यांचा दरवर्षी नाम सप्ताह असून हाच यात्रोत्सव मानला जातो. दरवर्षी अखंडहरिनाम सप्ताहाचे ग्रामस्थांच्या वतीने आयोजन केले जाते. याकरिता पंचक्रोशीतील भाविक भक्तांची हजेरी असते. गावात विविध मंदिरे आहेत. यात्रोत्सव ■ गावाचा खुंटलेला विकास करून चौफेर विकासाबरोबरच गावाचा नावलौकिक करण्याचा सर्वांच्या सहकार्याचा मानस आहे. गत अडीच वर्षात गावातील रस्ते, वीज, पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मूलभूत सोयीसुविधांबरोबर ग्रामस्थांना अद्यावत सुविधा ग्रा. पं. च्या वतीने देण्यात आल्या आहेत. प्रगती ■ मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून वाघळूज गावाची ख्याती आहे. ब्रिटिशांच्या काळात जकात नाका चौकी असल्याने वाघळूज हे नाव देण्यात आल्याची अख्यायिका आहे. प्राचीन काळातील विविध खाणाखुणा गाव परिसरात आजही पहावयास मिळतात. इतिहास ■ भविष्यात सी. सी. टी. चे काम, बांबंधिस्त बंधारे व कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवून गाव टंचाईमुक्त करण्याचा मानस आहे. गावात विविध प्रशासकीय योजना खेचून विकास कामे साधायची आहेत. सिमेंट रस्ते करून परिसरातील वाड्या, वस्त्या मुख्य प्रवाहात आणायच्या आहेत. यासाठी ग्रा.पं.चे प्रयत्न सुरू आहेत. आव्हाने साक्षरता शाळा सहकारी संस्था लोकसंख्या ६८१ (हे.) क्षेत्रफळ