शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांऐवजी कार्यालयात लावला चक्क स्वतःचाच फोटो; बीड जिल्ह्यात तलाठ्याचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 15:36 IST

तलाठ्याने स्वतःचाच फोटो लावणे हा धक्कादायक असून याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार विनोद गुंड्डमवार यांनी सांगितली आहे.

- नितीन कांबळे 

कडा ( बीड ) : शासकीय असो कि निम शासकीय कार्यालय तेथे महापुरुषांचे फोटो कार्यालयात लावणे बंधनकारक आहे. मात्र, एका तलाठ्याने कार्यालयात महापुरुषांच्या ऐवजी चक्क स्वतःचा फोटो लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आष्टी तालुक्यातील टाकळसिंग सज्जा येथे कार्यरत अरुण मोरे यांनी हा प्रताप केला आहे. स्वतःचा सैनिकाच्या गणवेशातील फोटो त्यांनी कार्यालयात दर्शनी भागात लावल्याचे दिसत आहे. 

आष्टी तालुक्यातील टाकळसिंग सज्जा ला नेमणूक असलेले तलाठी अरुण मोरे यांचे कार्यालय आष्टीत कृषी उत्पन्न बाजार समीती आवारात आहे. कार्यालयात महापुरुषांचे फोटो असणे लावण्याचा मोरे यांना विसर पडल्याचे दिसून आले. धक्कादायक म्हणजे, एकाही महापुरुषाचा फोटो न लावणाऱ्या तलाठी मोरे यांनी चक्क स्वतःचा फोटो कार्यालयात लावला आहे. आज सकाळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन पाहणी केली असता हे उघडकीस आले. हे निंदनीय असून तलाठी मोरे यांच्यावर वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल साळवे, दिपक जाधव यांनी केली आहे. 

महापुरुषांची आणि माझी बरोबरी नाही फोटो फ्रेम करून बॅग मध्ये ठेवला होता. फोटो फ्रेम गावाकडे नेयची होती, मात्र, काही मुलांनी तो फोटो भिंतीवर लावला. महापुरुष आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही. - अरुण मोरे, तलाठी, टाकळसिंग सज्जा

चौकशी करून कारवाई शासकीय नियमांनुसार कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत. पण तलाठ्याने स्वतःचाच फोटो लावणे हा धक्कादायक प्रकार आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. - विनोद गुंड्डमवार, तहसीलदार, आष्टी 

टॅग्स :BeedबीडTahasildarतहसीलदार