शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ट्रकचे टायर चोरणार्‍या टोळीचा म्होरक्या गजाआड; दोन लाखांचे टायर व पिकअप जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 17:18 IST

महामार्गालगत उभा असलेल्या ट्रकचे टायर चोरणार्‍या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीचा म्होरक्या शेख इलियास शेख इसाक (२५ रा.बालेपीर) याला गजाआड करण्यात आले आहे.

ठळक मुद्देरविवारी पहाटेही वाहतूक शाखेचे पथक गस्त घालत होते. याचवेळी बालेपीर भागात त्यांना टायर घेऊन जाणारे पिकअप दिसले. पथकाने त्यांना हटकले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावला. चौकशी करीत असतानाच पिकअपमधील चोरट्यांनी पळ काढला.

बीड : महामार्गालगत उभा असलेल्या ट्रकचे टायर चोरणार्‍या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीचा म्होरक्या शेख इलियास शेख इसाक (२५ रा.बालेपीर) याला गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी नगर रोडवरील बालेपीर भागात करण्यात आली. त्यांच्याकडून एका पिकअप वाहनासह दोन लाख रूपये किंमतीचे टायरही जप्त केले आहेत.

पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या सुचनेवरून सध्या शहरात गस्त वाढविण्यात आली आहे. रविवारी पहाटेही वाहतूक शाखेचे पथक गस्त घालत होते. याचवेळी बालेपीर भागात त्यांना टायर घेऊन जाणारे पिकअप दिसले. पथकाने त्यांना हटकले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावला. चौकशी करीत असतानाच पिकअपमधील चोरट्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला, मात्र ते मिळून आले नाहीत. 

रविवारी दिवसभर या चोरट्यांचा शोध घेण्यात आला. सायंकाळच्या सुमारास पळाल्या पैक्की शेख इलियास हा त्याच्या घरी लपल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून इतर आरोपींची माहिती घेतली जात असून त्याचे साथिदार हे शेजारील जिल्ह्याचे असल्याचे सांगण्यात आले. पोलीस पथक त्यांच्या मागावर आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप तेजनकर, तुळशीराम जगताप, शेख नसीर, प्रसाद कदम, संतोष कातखडे, प्रशांत सुसकर यांनी केली.

त्या तीन कर्मचार्‍यांचा सत्कारगस्तीदरम्यान वाहन पकडणार्‍या वाहतूक शाखेच्या रविंद्र नागरगोजे, मच्छिंद्र कप्पे, नितीन काकडे या तीन कर्मचार्‍यांचा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सत्कार केला. यावेळी अपर  पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची उपस्थिती होती.

इलियासला टायरची माहितीपोलिसांनी ताब्यात घेतलेला शेख इलियास हा पूर्वी हैदराबाद येथील आॅईलच्या कंपनीत होता. याठिकाणी टायर जाळून आॅईल काढले जात होते. त्यामुळे त्याला टायरची सर्व माहिती होती. यामध्ये भरपूर पैसा असल्याचे त्याला माहिती होते. त्यामुळेच त्याने इतर साथिदारांच्या सहाय्याने टायर चोरी सुरु केली.