शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयातच केली वकिलाने चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:44 IST

येथील सहदिवाणी न्यायालयात वकिलानेच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील सहदिवाणी न्यायालयात वकिलानेच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चोरट्या वकिलाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटकही करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.बीड येथील सहदिवाणी न्यायालयात (कनिष्ठ स्तर) प्रतिक्षा अंदुरकर या लघुलेखिका म्हणून कार्यरत आहेत. २० डिसेंबर रोजी त्यांनी वैद्यकीय कारणांमुळे मध्यान्हापूर्वी अर्ध्या दिवसाची रजा घेतली होती. त्यानंतर दुपारी त्या पुन्हा कार्यालयात आल्या. कामकाज करत असताना एका प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी त्या जबाब नोंदणी कक्षात गेल्या.त्यांनी संबंधितांचा जबाब नोंदवून तो संगणकातून ती फाइल त्यांच्या पेन ड्राइव्हमध्ये घेतली अन् पुन्हा त्या आपल्या कक्षात परत आल्या. सायंकाळी कार्यालय सुटण्यापूर्वी पावणेसहाच्या दरम्यान, त्या फ्रेश होण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या कक्षात कुणीच हजर नव्हते.याच दरम्यान त्यांचा ८ जीबी मेमरी क्षमता असलेला लाल रंगाचा पेन ड्राइव्ह चोरीला गेला. न्यायालयीन कामकाजाशी संबंधित महत्वाची माहिती असलेला पेन ड्राइव्ह चोरीला गेल्याने प्रतिक्षा अंदुरकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.पोलीस तपासात सीसीटिव्ही फुटेजमध्ये अ‍ॅड. यशवंत शिंदे हे वकील अंदुरकर यांच्या कक्षातून बाहेर पडताना दिसले होते. यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.शनिवारी त्याना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जमादार शंकर राठोड हे तपास करत आहेत.दरम्यान, यशवंत शिंदेकडून चोरीचा पेन ड्राईव्हही ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीArrestअटक