शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबी खरेदीसाठी सासरचा जाच; लग्नाला वर्षही न झालेल्या विवाहितेने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 15:33 IST

अकरा महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

ठळक मुद्देशिरुरकासार तालुक्यातील राक्षसभुवन येथील घटनाआत्महत्या नसून तिचा घातपात करण्यात आल्याचा माहेरच्यांचा आरोप

बीड : अवघ्या अकरा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून  राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभुवन येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान ही आत्महत्या नसून तिचा घातपात करण्यात आला, असा आरोप विवाहितेच्या माहेरच्यांनी केला. आरोपींना अटक केली नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू दिले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडला होता.

पोलिसांच्या अश्वासनानंतर नातेवाईक शांत झाले. सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.अमृता उर्फ सतिका शरद तांबे (२० रा.राक्षसभूवन ता.शिरुरकासार) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पौडुंळ क्र.३ (ता.शिरुरकासार) येथील अमृताचा मागील ११ महिन्यापूर्वीच राक्षसभूवन येथील शरद तांबे याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर काही महिने सुखाने संसार सुरु होता. त्यानंतर अमृताचा पोकलेन खरेदीसाठी माहेरहून पाच लाख घेवून ये, या कारणावरुन पती व सासरच्यांनी शारिरीक व मानसिक छळ सुरु केला. तांबे कुटूंबाकडे एक जेसीबी असतानाही अमृताचा पती शरद आणखी एका पोकलेन खरेदीसाठी पत्नीकडे पाच लाख रुपयांची वारंवार मागणी करत होता. सोमवारी सकाळी देखील अमृतानं भावाला फोन करून याबाबत सांगितले होेते. असे असतानाच मंगळवारी पहाटेच्या सुमारास अमृताने सासरी आपल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. सासू आणि पतीने तिला मृतावस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर  तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषीत केले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अमृताचे नातेवाईकही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.

अमृताचा पती आणि सासू पैशांची मागणी करत तिचा छळ करत होते. त्यामुळे तीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत आक्रमक पवीत्रा घेतला. सासरच्या लोकांना अटक होत नाही तोपर्यंत अमृताचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. माहिती मिळाल्यानंतर शिरुर ठाण्याचे पो.नि.सतिश वाघ यांच्यासह कर्मचारी रूग्णालयात आले. योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी सासरच्यांविरोधात छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोनि वाघ यांनी सांगितले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याBeedबीडdowryहुंडाPoliceपोलिस