शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर कड्यापर्यंत रेल्वे इंजिन धावले, आता बीडकरांना प्रतीक्षा रेल्वेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 19:34 IST

Railway in Beed : आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव येथील  सर्वात लांब रेल्वे पुलावरून इंजिनने आज चाचणी पार पाडली.

- नितीन कांबळे 

कडा - बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेल्वे प्रकल्प ( Railway In Beed ) आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून आज गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नगरहून कड्यापर्यंत रेल्वे इंजिनने ट्रॅकची चाचणी केली.पटरीवरून रेल्वे इंजिन धावतानाचे चित्र पाहून जिल्हावासियांना स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मात्र, आता रेल्वे कधी धावणार याकडे प्रतीक्षा लागली आहे.

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे या 261 किलोमीटरच्या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. नगर ते आष्टी या साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास एक इंजिन नगरवरून आष्टीच्या दिशेने मार्गस्थ झाले. अडीच वाजण्याच्या सुमारास या रेल्वे इंजिनचे आष्टी तालुक्यामध्ये आगमन झाले. सदरील रेल्वे इंजिन हे ट्रॅकची चाचणी करत असून येत्या काही दिवसात लवकरच हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे बीड जिल्हावासियांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार आहे. 

सर्वात लांब पुलावरून यशस्वी चाचणीआष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव येथील  सर्वात लांब रेल्वे पुलावरून इंजिनने आज चाचणी पार पाडली. हा 15 स्पॅनचा  पूल असून प्रत्येकाची लांबी 30.5 मीटर आहे. म्हणजेच जवळपास अर्धा किलोमीटर लांबीचा तर शंभर फूट उंचीचा हा पुल आहे.

तीन चाचण्यानंतर रेल्वे धावेल नगर ते कडा इथ पर्यंत गुरूवारी रेल्वे येण्यासाठी आथरलेले रूळाचे अस्थाईकरण करण्यासाठी कुठे चढ उतार किंवा इतर खराब नसावे म्हणून आज या रूळावरून रेल्वे इंजिन चालविण्यात आले. आणखी तीन वेळा ही चाचणी केल्यानंतर रेल्वे धावेल अशी माहिती नगर रेल्वेचे कनिष्ठ अभियंता मिना यांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेBeedबीड