शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वृद्धेच्या पायात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 11:35 IST

जखमेची पट्टी बदलताना आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागात खळबळ  पट्टी बदलताना प्रकार चव्हाट्यावर

बीड : जिल्हा रुग्णालयात चार दिवसांपूर्वी दाखल झालेल्या वृद्ध महिलेच्या पायात अळ्या झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. जखमेची पट्टी बदलताना आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

गऊबाई वामन जगताप (८५, रा. सात्रा, ता. बीड) असे उपचार घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. गऊबाई यांच्या पायाला थोडीशी जखम झाल्याने त्यांना चार दिवसांपूर्वी नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आणले. निदान करून त्यांना वॉर्ड क्र. ३ मध्ये दाखल केले. उपचाराकडे दुर्लक्ष झाल्याने जखम दिवसेंदिवस गंभीर होत गेली. त्यामुळे पायाला गँगरीन झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.दरम्यान, एवढी गंभीर परिस्थिती असतानाही डॉक्टरांकडून वेळच्या वेळी पट्टी बदलणे किंवा जखम स्वच्छ करणे अपेक्षित होते; परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नातेवाईकांनी विनंती केल्यानंतर परिचारिकांनी जखम स्वच्छ करून पट्टी बदलली. याच वेळी जखमेत अळ्या झाल्याचे उघडकीस आले. हा प्रकार पाहून नातेवाईकांना धक्काच बसला. 

एकीकडे जिल्हा रुग्णालय तत्पर उपचार करण्यात अव्वल  असल्याचा गवगवा केला जातो, तर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे घटना होणे निंदनीय आहे. त्यामुळे उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी  आहे.

यापूर्वी डोक्यात अळ्या पडल्याचा प्रकार उघडकीससाधारण महिन्यापूर्वी झाडावरून पडलेल्या व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली होती. वेळीच जखम स्वच्छ न केल्याने, तसेच वेळेवर पट्टी न बदलल्यामुळे त्या रुग्णाच्या डोक्यात अळ्या पडल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी सलाईनमध्ये शेवाळ निघाल्याने खळबळ उडाली होती. रोज नवनवीन प्रकार समोर येत असल्याने जिल्हा रुग्णालयातील उपचाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

संबंधित रुग्णावर उपचार करण्याबाबत हलगर्जी झाली आहे काय, याची पाहणी केली जाईल. स्वत: तपासणी करील. - डॉ. सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बीड

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर