शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्या तरुणांना श्रमदानाची शिक्षा; बीड जिल्हा न्यायालयाचा अनोखा निकाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 11:37 IST

आरोपींचे वय आणि भवितव्याचा विचार करून सामाजिक जाणिवेतून निकाला

ठळक मुद्दे४ ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी मंडळ अधिकाऱ्यास सहाजणांनी केली होती मारहाण ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू उपसा करून गेवराईकडे जात असताना अधिकाऱ्याची कारवाई

बीड : वाळू चोरी प्रकरणात मंडळ अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्या सहा आरोपींना पाणी फाऊंडेशनच्या कामावर दोन महिने श्रमदान करण्याची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी शुक्रवारी सुनावली. आरोपींचे वय आणि भवितव्याचा विचार करून सामाजिक जाणिवेतून दिलेला बीड जिल्ह्याच्या इतिहासातील हा पहिला अनोखा निकाल आहे.  

४ ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी मंडळ अधिकारी तथा फिर्यादी सुनील तांबारे आणि कोतवाल विठ्ठल रामराव सुतार  दुचाकीवरून गेवराई तालुक्यातील कोल्हेरमार्गे हिंगणगावकडे जात होते. त्यांना कोल्हेर शिवारात एक विनानंबरचे ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू उपसा करून गेवराईकडे जात असल्याचे आढळले. तांबारे यांनी हे ट्रॅक्टर पकडले असता आरोपी विशाल सुरेश भुंबे,   विशाल गोवर्धन पवार, कुमार बाळासाहेब नागरे, अक्षय आबासाहेब पंडीत, कृष्णा उर्फ किसन गंगाराम सजगणे, उदयकुमार गणेश पानखडे हे सहा तरुण त्याठिकाणी आले.  आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत कमरेचा पट्टा, दगड आणि विटाने तांबारे यांना मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तांबारे यांचा जीव वाचवला. 

सदर प्रकरणात सुनील तांबारे यांच्या फिर्यादीवरुन गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गेवराई पोलिस ठाण्याचे के.एच. पवार यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदरचे प्रकरण बीड सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड-२ ए.एस. गांधी यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, इतर साक्षीदारांचे जबाब व वैद्यकीय पुराव्याचे अवलोकन करून तसेच सहाय्यक सरकारी वकील अनिल तिडके यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून सर्व आरोपींना न्या. गांधी यांनी दोषी धरून वरील शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील म्हणून अनिल तिडके यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून शिवाजी डोंगरे यांनी मदत केली.

श्रमदान न केल्यास कारावासया प्रकरणात आरोपींचे वय आणि करिअरचा विचार करून सामाजिक भावनेने पाणी फाउंडेशनच्या पेंडगाव येथील कामावर दोन महिने किंवा काम संपेपर्यंत यापैकी जो कालावधी कमी असेल तोपर्यंत श्रमदान करण्याची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे सहा दोषी आरोपींना ३० हजार रूपयांचा दंड ठोठावला.  दंड न भरल्यास दोषींना सहा महिन्यांचा सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. त्याचप्रमाणे श्रमदान न केल्यास दोषींना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालयBeedबीडPrisonतुरुंगCrime Newsगुन्हेगारी