शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कुंडलिक खांडे-अनिल जगताप दोघेही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख; दोघांनाही व्हायचंय बीडचा आमदार

By सोमनाथ खताळ | Updated: January 25, 2024 16:26 IST

दोघांनीही ताणला 'बाण'; पत्रकार परिषदेतूनच केली निवडणूक लढविण्याची घोषणा 

बीड : विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. यात शिवसेनेच्या दोन जिल्हाप्रमुखांमध्येच चढाओढ लागल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून बाहेर पडताना अनिल जगताप यांनी आपणच बीड विधानसभा लढविणार असे ठामपणे सांगितले होते. त्यानंतर आता मंगळवारी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनीही आपणच बीडसाठी उमेदवारी मागणार असून ते जिंकूनही दाखवू, असा विश्वास व्यक्त केला आहे. दोघांनीही पत्रकार परिषद घेऊनच उमेदवारीची घोषणा केली आहे. आता ही जागा नेमकी मिळते कोणत्या पक्षाला? यावरही पुढील घडामोडी असणार आहेत.

काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणूक लागेल. त्या अनुषंगाने हे सर्वच पक्ष तयारी करत आहेत. त्यानंतर विधानसभेची तयारी सुरू होईल. जिल्ह्यात लोकसभेसाठी युतीकडून उमेदवार अंतिम समजले जात असले तरी विधानसभेत मात्र इच्छुकांची गर्दी होणार असल्याचे चित्र सर्वच विधानसभा मतदारसंघात पाहावयास मिळत आहे. यात बीडही अपवाद नाही. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून शिवसेनेत आलेले अनिल जगताप यांना मंगळवारी जिल्हाप्रमुख करण्यात आले. ठाकरे गट सोडताना जगताप यांनी कोणत्याही परिस्थितीत बीड विधानसभा लढणारच, असे जाहीर केले होते. त्यानंतर आता मंगळवारी कुंडलिक खांडे यांनीही बीड विधानसभेसाठी दावा केला आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागणार असून बीडला विधानसभा जिंकून दाखवू, असा विश्वासही व्यक्त केला आहे. दरम्यान, खांडे आणि जगताप हे दोघेही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. दोघांनाही बीड विधानसभा निवडणूक लढवायची आहे. परंतु पक्ष या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार? हा प्रश्न आहे.

बीडची जागा शिवसेनेकडे?आतापर्यंत बीडची जागा ही शिवसेनेला राखीव असायची. परंतु यावेळी युतीकडून भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्याकडूनही दावा केला जात आहे. जर ही जागा शिवसेनेला सुटली तरच खांडे किंवा जगताप यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळू शकते. जर बीडची जागा भाजपला सुटली तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के उमेदवार असतील. तसे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यापूर्वीच मस्के यांची घोषणा केली होती. राष्ट्रवादीला मिळाली तर डॉ. योगेश क्षीरसागर, बळीराम गवते हे दावेदार समजले जात आहेत. जयदत्त क्षीरसागर आणि शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटे यांनी अजूनही ठोस भूमिका घेतलेली नाही.

२०१९ चा उमेदवार मीच होतो, पण... २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने मलाच कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. मीच उमेदवार अंतिम होतो. परंतु ऐनवेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा प्रवेश झाला आणि मला माघार घ्यावी लागली. तरीही पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले. आता २०२४ साठी देखील मी इच्छुक असून तयारी करत आहे. पक्ष माझ्या कामाची दखल घेऊन उमेदवारी देईल, असा विश्वास असल्याचेही खांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBeedबीड