शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये क्षीरसागर भावा-भावांत रेस; एकाला थोरल्या तर दुसऱ्याला धाकल्या पवारांची साथ

By सोमनाथ खताळ | Updated: August 29, 2024 19:38 IST

विधानसभा राजकारण : एका पुतण्याला घेऊन काका जयदत्त क्षीरसागर यांची वेगळी चूल

बीड : जिल्ह्यात सध्या क्षीरसागर काका-पुतण्यांचा राजकीय वाद राज्याला परिचित आहे. बीड विधानसभेसाठी एकाच कुटुंबातील तिघे इच्छुक आहेत. यामध्ये आ. संदीप क्षीरसागर यांना शरद पवार तर डॉ. योगेश क्षीरसागर यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ आहे. सध्या तरी बीडमध्ये भावा-भावांतच रेस असल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला काका जयदत्त क्षीरसागर मात्र आपल्या एका पुतण्याला घेऊन वेगळी चूल मांडली असून सध्या तरी 'एकला चलो रे' च्या भूमिकेत आहेत.

राज्यात राजकीय घडामोडी झाल्यानंतर बीडमध्येही याचे परिणाम जाणवले. आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत राहिले तर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अजित पवार गटात एन्ट्री केली. त्यामुळे काका-पुतण्या असे राजकीय वातावरण तयार झाले. सध्या हे दोघेही भाऊ मतदार संघात सक्रिय आहेत. आपल्यालाच बीडचे तिकीट मिळेल, या आशेने प्रत्येकजण धावाधाव करत आहे.

बीडची जागेवर राष्ट्रवादी, शिवसेनेचा दावाबीडची जागा ही अनेक वर्षांपासून शिवसेनेची आहे. त्यामुळे यावेळी ती आम्हालाच मिळेल, असे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सांगितले होते. तर बीडमधील रनिंग आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे ज्यांचा आमदार त्यांची जागा, असा निकष लावून बीडची जागा आमचीच असेल, असा दावा अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी केला होता. बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासाठी एक शिष्टमंडळही अजित पवारांना भेटले होते.

काका सोबत एक पुतण्यामाजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची साथ दोन पुतण्यांनी सोडली. परंतु अजूनही एक पुतण्या त्यांच्या सोबतीला आहे. आ. संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ व बीड पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर हे काकाशी जवळीक साधून आहेत. बीडमध्ये झालेल्या मेळाव्यात हेमंत यांची व्यासपीठावर पहिल्या रांगेत उपस्थिती होती. जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत शिवसेनेने नाते ताेडल्यावर ते अजूनही कोणत्याच पक्षात नाहीत.

अजित पवार गटाकडून कोण इच्छुक?बीड विधानसभेसाठी अजित पवार गटाकडून डॉ. योगेश क्षीरसागर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यानंतर बळीराम गवते, तय्यब शेख यांनीही संपर्क वाढविला आहे. शरद पवार गटाकडून आ. संदीप क्षीरसागर वगळता इतर कोणीही फारसे सक्रिय नसल्याचे दिसते. त्यामुळे बीडच्या विधानसभेत क्षीरसागर भावांतच फाईट होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Sandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीडvidhan sabhaविधानसभाJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरSharad Pawarशरद पवार